Join us  

ज्वारीची- नाचणीची की गव्हाची? आपल्यासाठी कोणती भाकरी-चपाती योग्य हे कसं ठरवाल? -पाहा यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 10:55 AM

Health Benefits Of Eating Ragi, Jowar And Wheat Roti: आरोग्यासाठी नेमकी कोणती पोळी किंवा भाकरी खाणं अधिक चांगलं असतं, हा प्रश्न तुम्हालाही नेहमीच पडत असेल तर बघा याविषयीची माहिती....(which roti is useful for weight loss?)

ठळक मुद्देआपल्या शरीराच्या दृष्टीने नेमकं काय गरजेचं आहे, हे पाहा आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणती भाकरी किंवा चपाती तुम्ही खायला पाहिजे ते ठरवा...

वाढतं वजन, कमी वयातच मागे लागणारे बीपी, मधुमेह, हृदयविकारासारखे आजार यामुळे हल्ली बरेच जण आपल्या तब्येतीबाबत अधिक जागरुक झाले आहेत. खाण्या- पिण्याच्या सवयीही अनेकजण बराच प्रयत्न करून बदलू पाहात आहेत. जसा मैदा आहारात नको, तसंच ग्लूटेन फ्री डाएट घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. त्यामुळेच मग रोजच्या जेवणात रोजच पोळी न खाता कधी बाजरीची, कधी नाचणीची, कधी ज्वारीची भाकरी खाण्यावर भर दिला जात आहे. पण असं असताना नेमकी कोणती चपाती किंवा भाकरी (which roti or chapati is more beneficial for health) अधिक पौष्टिक असते (Ragi, Jowar or Wheat?), असा प्रश्न कधीतरी पडतोच. म्हणूनच पाहा त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर....(which roti is useful for weight loss?)

 

नाचणी आणि ज्वारीची भाकरी तसेच गव्हाची पाेळी यातून आपल्याला काय मिळतं आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने नेमकं काय गरजेचं आहे, हे पाहा आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणती भाकरी किंवा चपाती तुम्ही खायला पाहिजे ते ठरवा...

कोलेस्ट्राॅल वाढणार नाही- तब्येतही राहील एकदम ठणठणीत, फक्त 'या' ७ गोष्टी करा- फिट राहाल

१. ज्वारी आणि गव्हापेक्षा नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण थोडे अधिक आहे. नाचणीच्या एका भाकरीमधून ३.१ ग्रॅम, ज्वारीच्या भाकरीतून १. ४ ग्रॅम तर गव्हाच्या पोळीतून १. ९ ग्रॅम एवढे फायबर मिळते. 

 

२. ज्वारी हे सगळ्यात जास्त weight-loss-friendly धान्य म्हणून ओळखलं जातं. वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य द्यावं. 

कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

३. जेव्हा आपण नाचणीची भाकरी आणि गव्हाची पोळी यांची तुलना करतो, तेव्हा असं लक्षात येतं की नाचणी ही ग्लुटेन फ्री आहे. नाचणीमध्ये असणारे घटक हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात. नाचणीच्या भाकरीमुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर गव्हाच्या पोळीपेक्षा नाचणीची भाकरी अधिक उपयुक्त ठरते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्सगहू