Join us  

सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'या' पौष्टीक पीठाचे सूप प्या; वेट लॉस होईल - दिसाल सुडौल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 7:44 PM

Ragi Soup Recipe | Healthy Weight Loss Finger Millet Soup : रोज रात्री 'या' पिठाचे पौष्टीक चटकदार सूप प्या आणि वेट लॉस करा..

वाढलेलं वजन (Weight Gain) कमी करणं हे जणू टास्क (Weight Loss). वजन वाढलं की, शारीरिक हालचाल करण्यास थकवा येतो. यासह गंभीर आजारांचाही धोका वाढतो. आता काही दिवसात थंडीचे दिवस सुरु होतील (Fitness). या दिवसात वजन कमी करण्यास आव्हानात्मक वाटतं (Soup for Weight Loss). कारण थंडीत पहाटे छान झोप लागते आणि सकाळी उबदार अंथरुणातून बाहेर येण्याचे मन होत नाही. यामुळे सकाळी व्यायामाचे गणित बिघडते.

वजन कमी करण्यासाठी व्यायामासह आहाराकडेही लक्ष द्यायला हवे. थंडीत आपण जास्त प्रमाणात सूप पितो. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, नाचणीचा पौष्टीक सूप तयार करून प्या. यामुळे वेट लॉस होईल. या वेट लॉस सूपची रेसिपी डॉक्टर शिख सिंग यांनी दिली आहे(Ragi Soup Recipe | Healthy Weight Loss Finger Millet Soup).

वेट लॉस सूप करण्यसाठी लागणारं साहित्य

जिरं

लसूण

तेल

आलं

हिरवी मिरची

कांदा

गाजर

हिरवे वाटाणे

वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

सिमला मिरची

टोमॅटो

मीठ

नाचणीचं पीठ

पाणी

या पद्धतीने करा वेट लॉस सूप

सर्वात आधी कढईमध्ये १ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, बारीक चिरलेला लसूण, ठेचलेला आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, गाजर, हिरवे वाटाणे, सिमला मिरची, टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य तेलात भाजून घ्या.

भाज्या भाजून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. वाफेवर भाज्या शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये नाचणीचं पीठ घ्या. त्यात थोडं पाणी घालून मिक्स करा. ५ मिनिटानंतर नाचणीचं पाणी भाज्यांमध्ये घालून मिक्स करा. शेवटी लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे वेट लॉस सूप रेडी.

नाचणी खाण्याचे फायदे

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

नाचणीमध्ये पौष्टीक घटक असतात. यात अमिनो अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळतात. नाचणी अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते.

लठ्ठपणा, मायग्रेन, हृदयविकार, तणाव आणि मधुमेह कमी करण्यास देखील नाचणी मदत करते. आपण नाचणीची भाकरी, सूप किंवा नाचणीचे लाडू तयार करून खाऊ शकता.

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स