सतत तेलकट खाणं, जेवणाच्या वेळा चुकवणं यामुळे नसांमधलं कोलेस्टेरॉल वाढतं, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांचा आहारात समावेश करू शकता. (Health Tips) एलडीएल कोलेस्टेरॉल नसांमध्ये असलेलं एक प्रकारचे फॅट असते. (Cholesterol Control Tips) ज्यामुळे रक्ताच्या धमन्या ब्लॉक होऊ लागतात. ज्यामुले हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते एलडीएल कोलेस्टेरॉल नॉर्मलपेक्षा जास्त असते तेव्हा रामदेव बाबांनी सुचवलेले काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. (Ram Dev Baba Suggest Home Remedies For Cholesterol Control)
कोलेस्टेरॉल वाढण्याची लक्षणं कोणती? (Cholesterol Symptoms)
ब्रिटिश हेल्थ फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार शरीरात एलडीएल कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हाता-पायांना सूज येणं, डोळ्यांवर पिवळे फॅट तयार होणं, डोळ्यांवर पांढरे डाग पडणं अशा समस्या उद्भवतात. शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं दिसतात त्वरीत कंट्रोल करण्याचा उपाय करायला हवा. त्यासाठी रामदेव बाबांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. (According To The baba Ramdev Bottle Gourd And Garlic Cure Cholesterol Problem)
एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लसणाच्या सेवनाने कोलेस्टरॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. रिसर्चमध्ये दिसून आले की रोज 1 पाकळी लसूण खाल्ल्याने कोलेस्टेरॉल 10 टक्के कमी होते. संशोधकांनी सांगितले की रोज १ चमचा लसूण आणि लिंबाचा रस प्यायल्याने गंभीर आजार दूर होण्यास मदत होते.
रामदेव बाबांनी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सुचवले आहेत. यासाठी त्यांनी अनुलोम-विलोम हे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. अनुलोम-विलोम हे व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी सुखासनात बसा. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठ्याने नाकाचे छिद्र बंद करा. डोळे बंद करून आपल्या डाव्या नाकपूडीतून हळूहळू श्वास सोडा. काही सेकंदाच्या प्रक्रियेनंतर ही क्रिया उजव्या नाकपूडीतून करा. हा उपाय करताना आपली अनामिकेने नाकाचे छिद्र बंद करा.
काळे कमी पांढरे केसच जास्त दिसतात? आहारतज्ज्ञ सांगतात जेवणात 'हे' पदार्थ खा; काळेभोर होतील केस
रामदेव बाबा सांगतात की नियमित योगासनं करण्याबरोबरच कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी दुधीच्या रसाचे सेवन करायला हवे. दुधीचा रस तुम्ही घरीच तयार करून पिऊ शकता. यात एलडीएल कोलेस्टेरॉल, फॅट आणि लिपीड प्रोटीन्स असतात. ज्यामुळे प्रोटीन्सचे संतुलन व्यवस्थित राहण्यास मदत होते.
लसूण फायदेशीर ठरतो
बाबा रामदेव सांगतात की लसूण कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी फायदेशीर ठरतो. कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे. लसणात एलिसिन आणि मॅग्नीज असते. ज्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. लसणात एंटी व्हायरल, एंटी फंगल, एंटी ऑक्सिडेंट्युक्त गुण असतात.