Join us  

गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 8:13 AM

Weight Loss Tips: वेटलॉसच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. आता गरम पाणी (drinking hot water) प्यायलं की वजन कमी होतं (weight loss), असं आपण ऐकतोय. हे नेमकं कितपत खरं आहे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली विशेष माहिती.

ठळक मुद्देवेटलॉस करण्यासाठीचा हा उपाय सरसकट सगळ्यांनाच लागू होणारा असतो का? गरम पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटे आहेत का?

दररोज सकाळी उठून गरम पाणी पिण्याची सवय अनेक जणांना असते. काही जण दिवसभर गरम पाणीच पितात. कारण गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होतं, असं आपण ऐकलेलं असतं. पण खरंच गरम पाणी पिऊन वजन कमी होतं का? वेटलॉस करण्यासाठीचा हा उपाय सरसकट सगळ्यांनाच लागू होणारा असतो का? गरम पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटे आहेत का? (Really hot water is useful for weight loss?) असे विविध प्रश्न आपल्या मनात नेहमीच येतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी त्यांच्या The Mindful Diet या पेजवर शेअर केली आहेत.

 

गरम पाणी पिण्याचे फायदे१. गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने मेटाबॉलिक रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे अधिक चांगल्या पद्धतीने पचन होते.

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंगचं प्रगतीपुस्तक झालं व्हायरल, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले.....

२. गरम पाण्यासोबत अनेक औषधी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे औषधी शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण वाढतं. 

३. चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरावर सूज येते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. ही सूज कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीरावरची सूज कमी झाली की आपोआपच वजनही आकड्यांच्या स्वरुपात कमी झाल्याचे दिसून येते.

 

गरम पाणी पिण्याबाबत हे गैरसमज टाळा..१. गरम पाणी प्यायलं की सर्दी- खोकल्याचा त्रास कमी होतो, हा एक मोठा गैरसमज आहे. गरम पाणी हा काही त्यावरचा उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.

कारले पकोड्यांची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा... पाहा क्रिस्पी- कुरकुरीत रेसिपी

२. तसेच गरम पाणी प्यायलं की काहीही खाल्लं तरी वजन कमी होणारच, असं काहीही नाही. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यासोबतच आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही पोषक, सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे.

३. गरम पाणी पिणं सगळ्यांच्याच तब्येतीला मानवणारं नसतं. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, मुळव्याधीचा त्रास आहे, अशा लोकांनी गरम पाणी पिऊ नये.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सपाणीहेल्थ टिप्स