Join us  

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 4:36 PM

Here Are The Reasons Why You Should Eat White Rice : भात खायलाच हवा... ऋजुता दिवेकर सांगतेय किती व कोणता तांदूळ खायला हवा...

वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण भात खायचं सोडून देतात. डाएट करायचं म्हटलं तर यातून सर्वात आधी भात वगळला जातो. भात खाल्ल्याने वजन वाढते... भात खाल्ल्याने आपली ढेरी पुढे येते... भातामध्ये अधिक जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. अशा अनेक गोष्टी आपण आतापर्यंत भाताबद्दल ऐकल्याचं असतील. वजन कमी करायचं, वाढलेलं पोट कमी करायचं, बारीक दिसायचं तर सर्वात आधी भात खाणं बंद करा असा सल्ला दिला जातो. भात खाण्याबद्दल असे अनेक समज गैरसमज असले तरीही भाताचा आपल्या रोजच्या आहारात समावेश कराच, असे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते. 

भात खाणं प्रत्येकालाच कमी - अधिक प्रमाणांत आवडत असत.(Love eating rice? Know its health benefits from Rujuta Diwekar) परंतु आतापर्यंत आपल्याकडे भात खाण्याबद्दल अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. भात खावा तर किती खावा ? कोणत्या प्रकारचा भात खावा ? भात कधी खावा ? यासारख्या असंख्य प्रश्नांना छेद देत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) सांगते  तांदूळ म्हणजेच भात हा शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. भात न खाल्ल्यास शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात. ऋजुताने तर भात खाण्याचा आग्रह धरला आहे(reasons why celebrity nutritionist Rujuta Diwekar wants you to eat RICE!).

भात खाल्ल्याने वजन वाढत का ? 

शक्यतो भात खाल्ल्याने वजन वाढते असा समज आपल्याकडे आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी भात खाणे संपूर्णपणे बंद करावे असे समजले जाते. परंतु हा समज अतिशय चुकीचा असल्याचे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते. भाताबद्दल अधिक सांगताना ऋजुताने स्पष्ट केले आहे की, भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. तांदूळ हे प्रीबायोटिक आहे. हे फक्त आपल्यालाच नाही तर आपल्यातील सूक्ष्मजंतूंच्या विविध परिसंस्थेला पोसते. आतड्याच्या आरोग्यासाठी तांदूळ चांगले असल्याचे ऋजुता सांगते. तांदूळ आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच निरोगी जीवाणूंसाठी पोषक वातावरणास प्रोत्साहन देते. भात हा आपल्या पारंपरिक भारतीय जेवणातील एक मुख्य पदार्थ आहे त्यामुळे त्याचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा. 

पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

भात खायचा सोडून दिल्यास नक्की काय होऊ शकत ? 

भात खाणं बंद केलं तर शरीरातील दुखणी बंद होतात की वाढतात असा प्रश अनेकांना पडतो त्यावर ऋजुता सांगते, भात न खाल्ल्यास शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात. आपण अचानक भात खायचे बंद केल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर आपण डाएट करताना किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून भात खाणे सोडून दिले तर त्याचा गंभीर परिणाम आपली त्वचा, पाचन संस्था व केस यांवर झालेला दिसून येतो. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

नक्की कोणत्या प्रकारचा भात जास्त चांगला आहे ? 

अमुक एका राज्यांत पिकविला जाणारा तांदूळ हा चांगला असतो किंवा तांदुळाचा हाच एक प्रकार चांगला असतो, हे गैरसमज आहे. खरंतर प्रत्येक राज्यांनुसार त्या - त्या ठिकाणी पिकविला जाणारा तांदूळ हाच उत्तम असतो. आपण ज्या राज्यांत ज्या भागात राहतो तिथे पिकविला जाणारा तांदूळ खाण्याला पहिले प्राधान्य द्यावे. तांदळाची अमुक एक जात चांगली म्हणून त्याच प्रकारचा तांदूळ खाणे योग्य नाही. शक्यतो आपण ज्या राज्यांत राहतो त्या राज्यांत पिकणारा तांदूळ हा आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. 

ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

किती प्रमाणात भात खावा ?

भात खाण्याचे असे नेमके कोणते ठरलेले प्रमाण नाही आहे. आपण आपल्याला हवा तेवढा भात खाऊ शकता. परंतु भात खाताना तो आपल्या संपूर्ण आहाराचा एक भाग आहे हे लक्षात ठेवून मगच खावा. केवळ भात आवडतो म्हणून भातच खाऊ नये तर आपल्या ताटात सगळ्या पदार्थांचा योग्य त्या प्रमाणांत समावेश करावा. सगळ्यात शेवटी ऋजुता 'राईस इज नाईस' असे म्हणत भात खाण्याचा योग्य तो सल्ला देते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य