Join us  

बॅड कोलेस्टेराॅल कमी करायचं तर आवडीनं प्या दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस.. चवीपेक्षा परिणाम महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 7:06 PM

तुम्ही काय खाता पिता याचा परिणाम कोलेस्टेराॅल (cholesterol) वाढण्यावर किंवा कमी होण्यावर होतो. आहाराच्या माध्यमातून शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेराॅल (reduce bad cholesterol) कमी करायचं असल्यास दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस (bottle gourd and spinach juice to reduce bad cholesterol) पिण्याला महत्व आहे. या ज्यूसमुळे कोलेस्टेराॅल कमी तर होतंच शिवाय आरोग्यही निरोगी राहाण्यास मदत होते.

ठळक मुद्देभोपळा आणि पालकाच्या ज्यूसमुळे शरीरातील चरबी नियंत्रणात राहाते, कमी होते. कोलेस्टेराॅल वाढल्यानं बिघडलेला रक्तप्रवाह सुधारतो. दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस हे उत्तम एनर्जी ड्रिंक आणि डिटाॅक्स ड्रिंकही आहे. 

शरीरात बॅड कोलेस्टेराॅल वाढण्याच्या (increase cholesterol)  समस्येला अनेकांना तोंड द्यावं लागतंय. ही समस्या तरुणांमध्येही दिसून येत आहे.  शरीरात कोलेस्टेराॅल वाढल्यानं अनेक समस्या निर्माण होतात. कोलेस्टेराॅल वाढल्यानं रक्तदाब वाढून हदय रोगाचा धोका निर्माण होतो.  हदयाच्या धमण्यांमध्ये कोलेस्टेराॅलचं प्रमाण वाढल्यानं ऑक्सिजन आणि पोषक घटकांचं वहन होण्यास अडथळे निर्माण होतात. याचा संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोलेस्टेराॅल वाढल्यानं वजन वाढतं आणि वजन वाढल्यानं आजारपणंही वाढतात. वाढलेल्या कोलेस्टेराॅलमुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी कोलेस्टेराॅल कमी करणं आणि नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. ते नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा (healthy lifestyle to reduce cholesterol)  अवलंब करणं महत्वाचं. यात आहाराची भूमिका महत्त्वाची. तुम्ही काय खाता पिता याचा परिणाम कोलेस्टेराॅल (diet effects on cholesterol)  वाढण्यावर किंवा कमी होण्यावर होतो. आहाराच्या माध्यमातून शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेराॅल कमी करायचं असल्यास दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस (bottle gourd and spinach juice for reduce bad cholesterol)  पिण्याला महत्व आहे. या ज्यूसमुळे कोलेस्टेराॅल कमी तर होतंच शिवाय आरोग्यही निरोगी राहाण्यास मदत होते. 

कसं करायचं दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस?

कोलेस्टेराॅलवर उपाय म्हणून दूधी भोपळा आणि पालकाचं ज्यूस करण्यासाठी भोपळा धुवून त्याची सालं काढून घ्यावी. भोपळा बारीक चिरुन घ्यावा. पालक निवडून तो धुवन बारीक चिरुन घ्यावा. चिरलेला भोपळा आणि पालक एकत्र करुन मिक्सरच्या भांड्यात घालावा. त्यात थोडा ओवा, जिरे, सैंधव मीठ घालावं. मिक्सरमधून हे सर्व बारीक वाटून घ्यावं. यात थोडे पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर घातली तरी चालते. वाढलेलं मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्यावं आणि प्यावं. ओवा, जिरे आणि सैंधव मिठामुळे ज्यूस चविष्टही होतं. 

Image: Google

भोपळा आणि पालकाच्या ज्यूसचे फायदे

1. भोपळा आणि पालकाच्या ज्यूसमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.  या ज्यूसमध्ये क जीवनसत्व, लोह, ॲण्टिऑक्सिड्ण्टस आणि झिंक हे पोषक घटक असतात. या घटकांमुळे शरीरात चरबी साठत नाही. सकाळी रिकाम्या पोटी भोपळा आणि पालकाचं ज्यूस प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 

2. कोलेस्टेराॅल वाढल्यानं वजन वाढतं. वाढलेल्या वजनानं आरोग्याच्या इतर समस्याही डोकं वर काढतात. वजन वाढणं आणि त्याचे दुष्परिणामांचा धोका टाळायचा असेल तर भोपळा आणि पालकाचं ज्यूस सैंधव मीठ घालून प्यायला हवं. हे ज्यूस प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहातं.

3. शरीरात बॅड कोलेस्टेराॅल वाढल्यास यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात. यकृताला सूज येते. यासाठी आरोग्यादायी आहार महत्वाचा आहे. भोपळा आणि पालकाचं ज्यूस एनर्जी ड्रिंक म्हणूनही फायद्याचं ठरतं. हे ज्यूस प्यायल्यानं यकृताला सूज आलेली असल्यास ती कमी होते आणि बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. 

4. कोलेस्टेराॅल वाढल्यास त्याचा रक्त प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, हदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत भोपळा आणि पालकाचं ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे होतात. या ज्यूसमधून शरीरास  प्रथिनं, खनिजं, अ जीवनसत्वं आणि लोह हे घटक मिळतात. या घटकांमुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि रक्तप्रवाहही सुधारतो. 

टॅग्स :आहार योजनाआरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाककृतीहोम रेमेडी