Join us  

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 1:05 PM

Rice vs roti for Weight Loss What's Better for Dinner : रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही झोपता त्यामुळे रात्री खाल्लेले पदार्थ तुमचा फिटनेस, वजन आणि पचनावर परिणाम करतात

वजन कमी करू इच्छित असलेले लोक खूप कमी जेवतात किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात काही प्रमाणात बदल करतात. तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रोजच्या रुटीनमध्ये काय खायचं काय टाळायचे हे लक्षात ठेवायलं हवं. (Rice vs roti for weight loss what's better for dinner) खासकरून रात्रीचं जेवण हे दिवसभरातील शेवटचा आहार असतो. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही झोपता त्यामुळे रात्री खाल्लेले पदार्थ तुमचा फिटनेस, वजन आणि पचनावर  परिणाम करतात. (Weight loss Should you have rice or roti for dinner)

रात्रीच्यावेळी नेहमी हलकं जेवण करायला हवं. ६० ग्राम तांदळात ८० कॅलरीज, १ ग्राम प्रोटीन आणि ०.१ ग्राम फॅट्स आणि १८ ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. जास्त पोषक तत्वांच्या तुलनेत कॅलरीज जास्त असतात. तांदळात सोडीयमचे प्रमाण नगण्य असते तर १२० ग्राम गव्हात १९० मिलिग्राम सोडीयम असते. भात किंवा चपाती खाणं पूर्णपणे बंद करणं जवळजवळ अशक्य आहे. फक्त तुम्ही योग्य प्रमाणात याचे सेवन करू शकता.

छातीचा भाग फारच लहान दिसतो? स्तनांचा आकार वाढवण्याच्या ४ टिप्स; शरीर दिसेल सुडौल-सुंदर

रात्रीच्या जेवणाला काय खायचं ते तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवू सकता.  चपाती, भात या दोन्ही पर्यायांचे फायदे लक्षात घेऊन तुम्ही हे ठरवू  शकता. भातात कार्ब्स असतात. कार्ब्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फॅट्स जमा होता आणि वजनही वाढू शकतं.

भात खायचा की चपाती याचा निर्णय घेणं कठीण होतं. प्रोटीन्सयुक्त भाज्यांबरोबर तुम्ही भात किंवा चपाती काहीही खाऊ शकतात. ब्रोकोली, गाजर, पालक यांसारख्या भाज्या शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात.

पोट सुटलंय, व्यायामाला वेळ नाही? बेडवर पडल्या पडल्या ३ योगासनं करा-पोट होईल एकदम फ्लॅट

रात्री किती चपात्या खाव्यात?

तुमचे वय तुम्ही किती सक्रीय आहात यावर अवलंबून असावे की तुम्ही किती खात आहात. रात्रीच्या जेवणाला जास्त न खाता  एक ऐवजी दोन चपात्या तुम्ही खाऊ शकता. भाताच्या तुलनेत चपाती पचवणं कठीण असतं. जास्त उशिरा जेवल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून रात्रीच्यावेळी कमीत कमी खा.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य