अभिनेते किंवा खेळाडूंचे व्यायामप्रकार, आवडीचे पदार्थ किंवा डाएट जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडते (Diet Plan). एखाद्या अभिनेत्रीने किंवा खेळाडूने वाढलेले वजन कसे कमी केले? याबाबत तर जाणून घ्यायला चाहत्यांना खूप उत्सुकता असते (Rishabh Pant). सध्या लोकांमध्ये आयपीएलचं क्रेझ पाहायला मिळत आहे. आता पुढच्यावर्षी १८ वा सिझन असणार आहे. ज्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा मेगा ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्स टीमने २७ कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं.
भीषण अपघात घडला, तो उठला, त्याने हार नाही मानली. स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिलं आणि पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला(Rishabh Pant's Loses 16 Kgs In Four Months - Here's How).
टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटनुसार, 'फिटनेस जगतात क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या वेट लॉसची चर्चा होत आहे. इंडिया टी- २० वर्ल्ड कपसाठी त्याने चक्क ४ महिन्यात १६ किलो वजन घटवलं. वेट लॉससाठी नेमक्या कोणत्या गोष्टी त्याने अंगीकारल्या?
अशा प्रकारे ऋषभ पंत स्वतःला तंदुरुस्त ठेवतो
ऋषभ पंत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी घरी बनवलेले अन्न खातो. ऋषभने त्याच्या आहारात कमीत कमी बाहेरील पदार्थांचा समावेश केला आहे. रिपोर्ट्सनुसार, ऋषभला ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले होममेड फूड खायला आवडते.
साखर आणि प्रोसेस्ड पदार्थ खाणं टाळतो
ऋषभ पंतने आपल्या आहारातून साखर आणि प्रोसेस्ड पदार्थांना वगळलं आहे. ऋषभ पंत कमीत कमी बाहेरचे पदार्थ खातो. अनहेल्दी फॅट्सपासून तो दूर राहतो. बिर्याणी किंवा रसमलाई सारख्या पदार्थांपासून तो दूर राहतो.
कमी कॅलरीयुक्त डिश
ऋषभच्या आहारात चविष्ट पण कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश आहे. ऋषभला भेंडीची भाजी फार आवडते. जे केवळ आरोग्यदायीच नाही तर अतिशय चवदार देखील आहे.
हे पदार्थ देखील ऋषभच्या आहाराचा एक भाग आहेत
गेल्या वर्षी त्याच्या रिकव्हरीदरम्यान, ऋषभने त्याच्या आहारात राजगिऱ्याच्या पिठाची पोळी, पराठे, ॲण्टी इन्फ्लेमेण्टरी गुणधर्म असलेले अननस, सेलेरी, आले आणि पुदिन्याच्या ज्यूसचा समावेश केला होता. वेट लॉससाठी हे पदार्थ मदत करतात. यासह रिकव्हरीमध्ये त्याने सतत २० दिवस खिचडी खाल्ली होती.
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
रक्त वाढवण्यासाठी ऋषभ काय खातो?
अपघातानंतर ऋषभ पंत रक्त वाढवण्यासाठी मनुका, अक्रोड, मध, खजूर आणि खोबऱ्याचे लाडू खाल्ले. दुपारच्या जेवणात पंत नाचणीपासून बनवलेली खिचडी, डोसा किंवा पोळ्या खात असत. रात्रीच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असे.