Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

Roasted Chick Peas Benefits :

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:09 PM2023-10-23T16:09:47+5:302023-10-24T10:48:47+5:30

Roasted Chick Peas Benefits :

Roasted Chick Peas Benefits : Health Benefits of Roasted Chana or Chickpeas | घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

भाजललेले चणे हा  एक उत्तम स्नॅक्स आहे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी किंवा प्रवासात कुठेही या स्नॅक्सचे सेवन करू शकता. भाजलेले चणे हा एक हेल्दी ऑपश्न असून जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. भाजलेले चणे जास्तीची भूक कमी करण्यासाठी, उर्जा वाढवण्याासाठी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. भाजलेले चणे खाण्याचे बरेच फायदे आहेत. (Roasted Chick Peas Eating benefits)

भाजलेल्या चण्यांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स, प्रोटीन्स आणि फायबर्स अशी महत्वाची तत्व असतात.  जे शरीराचं कार्य सुरळीत होण्यासाठी गरजेचे असतात. भाजलेल्या चण्यांचे सेवन वजन कमी करण्यसाठी आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून  काढण्याचा एक उत्तम उपाय आहे.  भाजलेले चणे खाल्ल्याने आश्चर्यकारक फायदे मिळतात. चण्यांमधील फायबर्स, प्रोटीन भूक नियंत्रणात आणतात आणि अन्न पचवण्यास मदत करतात. (Find Roasted Chana Calories & Nutrition Facts)

हार्ट आणि मेंदूसाठी फायदेशीर

चण्यांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स आणि फायटोन्युट्रिएंटस असतात. हे हेल्दी ब्लड वेसल्सना वाढवतात. काळ्या चण्यांमधील पोषक तत्व रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखते आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते

भाजलेल्या चण्यांमध्ये स्टेरोल नावाचे एंटीऑक्सिडेंट्सस असतात. ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे एब्जॉप्शन कमी होते.  शरीरातील खराब कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते.  

कंबर, मांड्या खूपच जाड दिसतात? 30-30-30 फॉर्म्यूला ट्राय करा, महिन्याभरात व्हाल स्लिम

प्रोटीनचा खजिना

चण्यांमध्ये सर्वाधिक प्रोटीन असते. चणे प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. चणे भाजल्याने यातील पोषक तत्व जराही कमी होत नाहीत. शरीरातील नवीन पेशींच्या निर्मीतीसाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरूणांना हे खाण्याची जास्त गरज असते. 

डायबिटीसच्या रुग्णांसाठीही गुणकारी

चण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यास डायबिटीसच्या रुग्णांना हे पदार्थ पोषक मानले जातात. यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.  मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

पोटभर भात खा-कणभरही वजन वाढणार नाही; तांदूळ 'या' ३ पद्धतीने शिजवा, पोट राहील स्लिम

हाडं मजबूत राहतात

भाजलेले  चणे हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतात. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार भाजलेल्या चण्यांमधील मॅग्ननीज आणि फॉस्फरेस हाडांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. यामुळे सांधेदुखीच्या वेदना जाणवत नाहीत. 

Web Title: Roasted Chick Peas Benefits : Health Benefits of Roasted Chana or Chickpeas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.