Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : काहीजणांना भात आवडतो तर काहींना चपातीशिवाय जेवण जात नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:08 PM2024-03-28T13:08:56+5:302024-03-28T13:21:36+5:30

Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : काहीजणांना भात आवडतो तर काहींना चपातीशिवाय जेवण जात नाही.

Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : Which Is The Healthier For Weight Loss | चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

चपाती आणि भात भारतीय जेवणाचा महत्वाचा भाग आहे. (Health Tips) भारतीय घरांमध्ये लंच आणि डिनरमध्ये  चपाती, भात असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Weight Loss Tips) अनेकदा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी लोक भात किंवा चपाती खाणं टाळतात.  वेट लॉस करण्यासाठी भात कमी खायचा की चपाती असा प्रश्न अनेकांना  पडतो. (Rice Or Roti Weight Loss)

काहीजणांना भात आवडतो तर काहींना चपातीशिवाय जेवण जात नाही. भारतभरात व्यापक स्वरूपात हे  दोन्ही पदार्थ खाल्ले जातात. यातील पोषक तत्व शरीराच्या चांगल्या कार्यासाठी, रक्त तयार होण्यासाठी फायदेशीर ठरतात. भात की चपाती कोणता पदार्थ खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात ते समजून घेऊया. (Which Is The Healthier For Weight Loss)

चपातीत सोडीयमचे प्रमाण जास्त

 भात आणि चपाती दोघांमध्येही फार फरक नाही. दोघांचीही कॅलरी वॅल्यू आणि पोषक तत्व जवळपास एकसारखीच असतात. या दोन्हीच्या पोषक तत्वांमध्ये सोडीयमचा फकत आहे. तांदळाच्या तुलनेत चपातीत सोडीयमचे प्रमाण जास्त असते. १२० ग्राम गव्हाच्या पीठात जवळपास १९० मिलीग्राम सोडीयम असते. तर  तांदूळात सोडीयम नगण्य असते. डॉक्टरांच्यामते जर तुम्हाला असा कोणताही आजार आहे ज्यात सोडीयम खाणं टाळायला हवं अशावेळी चपातीऐवजी भााताचा आहारात समावेश करा.

वजन कमी करायचं असेल तर चपाती खाण्याला प्राधान्य द्या

तांदळाच्या तुलनेत चपातीत जास्त फायबर्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.चपाती खाल्ल्याने बराचवेळ पोट भरलेलं राहतं ज्यामुळे ओव्हर इटींग होत  नाही. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर चपाती खाण्याचा सल्ला देतात. याशिवाय तुम्ही चपाती टाळून भाकरी देखील खाऊ शकता. 

भात पचायला हलका असतो

चपाती पचायला जास्त वेळ लागतो. ज्यामळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं कठीण होतं. भातात जास्त प्रमाणात स्टार्च असते. ज्यामुळे अन्न सहज पचते. डॉक्टरांच्यामते ज्या लोकांचे पोट खराब असते त्यांच्यासाठी तांदूळ हा उत्तम पर्याय आहे.

चपातीत अधिक पोषक तत्व असतात

तांदूळाच्या तुलनेत चपातीत अधिक पोषक तत्व असतात. चपातीत पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरेस अधिक असते.  तांदूळात कॅल्शियम नसते. याशिवाय पोटॅशियम आणि फॉस्फरेसही कमी असते. तर तांदूळाच्या तेलनेत चपातीत फॉलेट आणि व्हिटामीन बी जास्त प्रमाणात असते.

Web Title: Roti Or Rice Which One Is Better For Weight Loss : Which Is The Healthier For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.