Join us  

वेट लॉससाठी चपाती खाणे योग्य की भाकरी? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी - त्वचेवर ग्लो हवा तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 12:09 PM

Roti vs Bhakri: What's healthier for your weight loss journey? : चपाती खाल्ल्याने वजन कमी होतं की भाकरी खाणं उत्तम?

आपल्याकडे चपाती (Chapati) अर्थात पोळी आणि भाकरी (Bhakri) हे दोन प्रकार आवर्जून खाल्ले जातात (Weight loss). काही घरांमध्ये चपाती खाल्ली जाते. तर काही घरांमध्ये भाकरी. वेट लॉस दरम्यान, लोक चपाती वगळून भाकरी खाण्याचा सल्ला देतात. पण खरंच चपाती न खाता, भाकरी खाल्ल्याने वजन कमी होते का? भाकरी अनेक प्रकारची केली जाते. नाचणी, ज्वारी, तांदळाची भाकरी अशा धान्याच्या केल्या जातात. तर चपाती गव्हाची केली जाते. पण मग असा प्रश्न निर्माण होतो की, वेट लॉसदरम्यान भाकरी खावी की चपाती? यापैकी वजन कमी करण्यासाठी नक्की काय जास्त उपयोगी ठरेल?

यासंदर्भात, माहिती देताना फिटनेस कोच प्रांजळ ढमाले सांगतात, 'जर आपल्या वजन कमी करायचं असेल तर, चपातीऐवजी भाकरी खाणं केव्हाही उत्तम. ज्वारीच्या भाकरीमध्ये गव्हाच्या चपात्यापेक्षा कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळतात. शिवाय वेट लॉसही होते'(Roti vs Bhakri: What's healthier for your weight loss journey?).

चपाती की भाकरी नक्की काय खावं?

भाकरीमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. त्यात प्रोटीन, कार्ब्स आणि फायबर असते. या गोष्टी अर्थात चपातीमध्ये देखील असतात. पण भाकरी खाल्ल्याने लवकर पोट भरतं आणि भूकही लवकर लागत नाही. यामध्ये हाय फायबर असल्याने पोटाला चांगला आधार मिळतो. शिवाय वेट लॉससाठीही मदत होते.

फक्त १५ मिनिटांत प्रेशर कूकरमध्ये लावा दही! पाहा दही लावण्याची युनिक ट्रिक, मिळेल परफेक्ट दही

कॅलरीज डेफिसिट

वेट लॉस करायचं असेल तर, कॅलरीज डेफिसिटवर लक्ष द्यायला हवे. जेवढे कमी कॅलरीज खाल तितके वेट लॉससाठी मदत मिळू शकते. चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तर, ज्वारीच्या भाकरीमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे चपातीऐवजी आपण भाकरी खाऊ शकता.

२ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट

पोषक तत्व

भाकरी हे पोषक तत्वांचा भंडार आहे. त्यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स असते. ज्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शिवाय ज्वारी ही ग्लूटेन फ्री असते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. मुख्य म्हणजे त्यात अँटी ऑक्सिडेंट आणि मल्टी व्हिटॅमिन. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

पचन क्षमता

चपातीपेक्षा भाकरी लवकर पचते. काहींना चपाती पचत नाही. अशावेळी आपण भाकरी खाऊ शकता. भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे भाकरी लवकर पचते, आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स