Join us  

ऋजुता दिवेकर म्हणतात दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही, 'कहानी'वाली मिठाई खा... म्हणजे नेमकं काय?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 4:10 PM

Rujuta Divekar's Diet Tips About Mithai: कॅलरीवाली मिठाई आणि कहानीवाली मिठाई म्हणजे नेमकं काय असतं बरं?

ठळक मुद्देआपण असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत जे आपल्याकडच्या खाद्यसंस्कृतीची श्रीमंती सांगतात. मग भलेही तुम्ही अगदी एक- दोन पदार्थच खा. पण .....

दिवाळी आता अवघ्या दोन- तीन दिवसांवर आली आहे. त्यामुळे दिवाळीची घरोघरी जोरदार तयारी सुरू असून स्वयंपाक घरात वेगवेगळे खमंग पदार्थ कधी करायचे, कसे करायचे याचं प्लॅनिंगही सुरू झालं आहे (Diwali Celebration 2024). ही नुसती चर्चा ऐकली तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते (Diwali faral). मग जेव्हा ते पदार्थ प्रत्यक्ष तुमच्या समोर येतात, तेव्हा ते खाण्याचा मोह होणं अगदी स्वाभाविक आहे. एरवी आपण खूप डाएट करतो, सगळी पथ्यं सांभाळतो. पण कधीतरी सणासुदीचा आनंद घेण्यासाठी गोडधोड खावं वाटतंच. असं तुम्हालाही खावं वाटलं, तर नेमके कोणते पदार्थ खावे याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच..(Rujuta Divekar's Diet Tips About Mithai)

 

दिवाळीत गोड पदार्थ खाण्याचा मोह झाला तर...

ऋजुता दिवेकर यांनी खास दिवाळीतले गोडधोड पदार्थ याविषयी छानशी माहिती देणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अगदी आवर्जून सांगितलेली एक गोष्ट म्हणजे यंदाच्या दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही तर 'कहानी'वाली मिठाई खा..

आता चवळीची शेंग झालेल्या अभिनेत्री बघा पुर्वी किती जाड होत्या- वजन कमी करण्यासाठी त्यांनी....

आता ही कॅलरी असणारी आणि कहानी असणारी मिठाई म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते पाहा.. ऋजुता सांगतात की हल्ली दिवाळीत मिठाईचे बॉक्स आपल्या घरी येतात. त्या प्रत्येक बॉक्सवर त्या मिठाईमध्ये किती कॅलरी आहेत, याची माहिती लिहिलेली असते. अशी कॅलरी लिहून येणारी मिठाई साहजिकतच विकतची असते. अशी विकतची मिठाई खाणं टाळा आणि घरी तयार केलेली मिठाई खा, असं त्यांचं म्हणणं आहे.

 

ऋजुता म्हणतात की आपल्याकडच्या दिवाळीच्या पदार्थांना त्यांची त्यांची एक खास गोष्ट असते. म्हणजेच 'अनारसा खावा तर तो अमूक मावशीच्या हातचाच..', 'काकूच्या हातच्या करंज्यांना जी चव आहे, ती अन्य कशातच नाही..' किंवा 'हे रव्याचे लाडू खास आजी सांगते त्या रेसिपीने केले आहे..'

टीनएजर्स मुलींनी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? आईचं क्रिम घेऊन चेहऱ्याला लावत असाल तर....

अशी छोटी छोटी गोष्ट, किस्से घरी केलेल्या प्रत्येक पदार्थाच्या मागे असतातच. या पदार्थांमधून, त्यांच्या रेसिपींमधून आपल्याकडची खाद्यसंस्कृती दिसून येते. आपण असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत जे आपल्याकडच्या खाद्यसंस्कृतीची श्रीमंती सांगतात. मग भलेही तुम्ही अगदी एक- दोन पदार्थच खा. पण ते घरी तयार केलेले पदार्थ खा. विकतचे गोड पदार्थ खाणं कटाक्षाने टाळा.. चला तर मग आता एक यादी करायला घ्या- तुमच्या घरी असलेल्या पदार्थांपैकी कॅलरीवाले किती आणि कहानीवाले किती... 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआहार योजनादिवाळी 2024अन्न