साखर हा आपल्या रोजच्या आहारातील एक महत्वाचा भाग आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात गोड, तिखट, आंबट, तुरट अशा अनेक चवींचा आस्वाद घेत असतो. साखर हा आपल्या रोजच्या खाण्यातील महत्वाचा भाग असला तरीही, आजकाल बरेचजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक झाले आहेत. साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे विविध आजार होतात. यामुळेच बऱ्याचदा काही लोक आपल्या आहारातून साखरेचे प्रमाण कमी करतात किंवा कायमचे साखर खाणे सोडून देतात. कायमची आहारातून साखर सोडून देणे, कमी करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे.
आजच्या बदलत्या काळानुसार आपल्यापैकी काहीजण साखर खाणे सोडून देतात तर काहीजण कृत्रिमरित्या बनवलेली साखर खाणे पसंत करतात. काहीजण शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल म्हणून साखरेचे पदार्थ, फळं यांसारख्या इतर गोष्टी खाणे सोडून देतात. सध्याच्या काळात नैसर्गिकपणे आहारातून मिळणारी साखर खायचे सोडून आपण कृत्रिमरित्या बनवलेल्या स्वीटनर्सचा वापर करतो. नैसर्गिक साखर सोडून अशा स्वीटनर्सचा वापर करणे किती योग्य आहे ? दिवसभरात किती साखर खाल्ली पाहिजे ? साखर कोणत्या पद्धतीने खाल्ली पाहिजे ? दिवसाला किती आणि कशी साखर खाल्ली तर आपण आजारापांसून लांब राहू शकतो. या सगळ्याबाबतीत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे(Rujuta Diwekar Shares Proper Guidelines About Consuming Sugar Know 4 Best Tips).
नॉन शुग स्टिटनर खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्ट्टीने कितपत योग्य आहे?
WHO च्या अहवालानुसार ऋजुता दिवेकरने ही माहिती दिली आहे. हा अहवाल नॉन-शुगर स्वीटनर्स (NSS), मार्च २०२३ मधील आहे. WHO ने शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा मधुमेह, हृदयविकार सारख्या असंसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी महत्वाची माहिती दिली आहे. WHO ने NSS चा वापर टाळण्याबाबत सांगितले आहे. सर्व सिंथेटिक आणि नैसर्गिकरित्या उद्भवणारे किंवा सुधारित नॉन-पौष्टिक गोड पदार्थांचा समावेश आहे. जसे की, aspartame, saccharin, sucralose, stevia, and stevia derivatives यांचा यामध्ये समावेश आहे.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
दिवसातून किती चमचे साखर खावी ?
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिवसभरांतून किती चमचे साखर खावी याबाबदल सांगताना म्हणतात की, WHO च्या अहवालानुसार, दिवसभरातील डाएटमध्ये ५ ते १० % साखर असणे गरजेचे असते. ही साखर नैसर्गिक असणेही आवश्यक आहे. म्हणजे दिवसातून आपण ६ ते १२ चमचे साखर खाऊ शकता. मग ही साखर आपण चहा - कॉफी, उन्हाळ्यात प्यायली जाणारी सरबते, तसेच फळातून मिळणारी नैसर्गिक साखर अशा विविध पद्धतीने खाऊ शकतो.
काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा...
१. चहा-कॉफीमध्ये साखर घालणे टाळून स्वीटनर्स घेऊ नका, कारण ते शरीरासाठी खूप घातक असतात. २. चहा कॉफीमधून साखर घेताना त्याचे प्रमाण योग्य ठेवा. गरजेपेक्षा जास्त साखर घालणे टाळावे. ३. घरगुती पदार्थात लाडू, खीर यासारखे पदार्थ खाताना ते प्रमाणापेक्षा जास्त गोड असू नयेत. ४. प्रत्येकी ऋतूंत येणारी ताजी फळे खाण्याला प्राधान्य द्या. अगदी आंबा देखील मनसोक्त खा.
दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
हे पदार्थ खाणे टाळाच...
१. अनेकदा आपण पॅकेज ज्यूस पितो ज्यामध्ये कमी साखर असते पण ते शरीरासाठी घातक असतं.२. पॅक्ड फूड, कोला, एनर्जी ड्रिंक्स हे आहारातून हद्दपार कराच. ३. वारंवार केचअप, जॅम खाणे टाळा. ४. कुकीज, बिस्किट यांसारखे पदार्थ खाणे टाळा.