Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक

ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक

Sabja Seeds For Weight Loss : रिसर्चनुसार या बियांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:07 AM2024-05-20T10:07:12+5:302024-05-20T16:01:53+5:30

Sabja Seeds For Weight Loss : रिसर्चनुसार या बियांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

Sabja Seeds For Weight Loss : According To Research Sabja Seeds May Help In Weight Loss Burning Belly Fat | ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक

ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात अनेकदा खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही अशावेळी काही घरगुती उपाय करू शकता. (Weight Loss Tips) घरगुती उपायांच्या वापराने वजन लवकर नियंत्रणात आणण्यासही मदत होईल. प्रसिद्ध डायटिशियन आयुषी यादव यांनी सांगितले की सब्जाच्या बिया खाल्ल्याने फक्त वजन कमी करणं शक्य होत नाही तर इतर शारीरिक समस्या दूर होण्यासही मदत होते.  सब्जाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. (According To Research Sabja Seeds May Help In Weight Loss Burning Belly Fat)

सब्जात कोणते न्युट्रिएंट्स असतात (Nutritional Value Of Sabja)

कोलोर हेल्थ केअरच्या रिपोर्टनुसार सब्जाच्या बियांमध्ये ४२ टक्के कार्ब्स, २० टक्के प्रोटीन्स, २५ टक्के हेल्दी फॅट्स असतात यात कमीत कमी कॅलरीज असतात. यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स मिनरल्स पोटॅशियम, मॅग्ननीज, कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम याशिवाय व्हिटामीन सी असते.  रिसर्चनुसार या बियांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. कारण यात फायबर्स असतात. ज्यामुळे बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं.  प्रोटीन, फायबर्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन के, मॅग्नेशियम, एंटी ऑक्सिडेंट्स, आयर्न फॅटी एसिड्स, पोटॅशियम, फॉलिक एसिड, कार्बोहायड्रेट्स यांसारखे न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होतो. 

सब्जाचा आहारात कोणत्या पद्धतीने समावेश करता येतो?

सब्जातून अनेक पोषक घटक शरीराला मिळतात. स्मूदीज, मिल्कशेक, सूप, सॅलेड ड्रेसिंग, दही, पुडींग, ओट्स, पॅनकेक्स, बेकींग ब्रे़ड्स आणि मफिन्समधून शरीराला पोषक घटक मिळतात. सब्जा सिड्स भाजलेल्या पदार्थांमध्ये घालू शकता.  सब्जाच्या बियांच्या सेवनाने तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. यासाठी रात्रीच्यावेळी सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गरम करून त्यात लिंबाचा रस मिसळा यामुळे भूक कमी लागते आणि तुम्ही ओव्हरइटींग टाळता. सब्जा पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. यासाठी सकाळी उकळत्या पाण्याबरोबर या बियांचे सेवन करा. ज्यामुळे गॅस, एसिडीटी, पोटात जळजळ होणं यांसारख्या समस्यांपासून आराम मिळेल. 

आजकाल अंगदुखीच्या वेदना अनेकांना जाणवतात.  ज्यामुळे लोकांची हाडं कमकुवत असल्याचं दिसून येतं. जर तुम्ही रेग्युलर सब्जाच्या बियांचे सेवन केले तर शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही हाडं मजबूत होण्यास मदत होईल. या पारंपारिक उपचार पद्धतीनुसार, बिया उन्हाळ्यात नैसर्गिक कूलर म्हणून कार्य करतात आणि वात आणि पित्त यांच्याशी संबंधित दोषांना शांत करतात. 

Web Title: Sabja Seeds For Weight Loss : According To Research Sabja Seeds May Help In Weight Loss Burning Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.