Join us  

काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 9:29 AM

Sadhguru Jaggi Vasudev Diet Plan : सद्गुरू जग्गी वासुदेव फिट राहण्यासाठी एकदम साधा- सोपा आहार घेतात. त्यांच्यामते आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.

आजकाल वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. एकदा वजन वाढलं की कमी होता होत नाही. वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. (Diet Tips by Sadhguru Jaggi Vasudev)सद्गुरू जग्गी वासुदेव वेगवेगळ्या विषयांवर प्रवचन देऊन सामान्यांचा पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर देतात.  आरोग्याच्या बाबतीतही त्यांनी अनेक गोष्ट सांगितल्या आहेत.  ते स्वत: काय खातात त्यांचा डाएट प्लॅन कसा आहे. याबाबतही त्यांनी व्हिडियोच्या माध्यमातून सांगितले आहे.  (Sadhguru Jaggi Vasudev Diet Plan)

सद्गुरू जग्गी वासुदेव फिट राहण्यासाठी एकदम साधा- सोपा आहार घेतात. त्यांच्यामते आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचेल असे पदार्थ न खाता नेहमीच हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करावा. कारण अन्हेल्दी खाण्यापिण्यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. रोजचा साधा आहार  घेऊनही तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता. पूर्ण दिवस एनर्जेटीक राहण्यासाठी काय खायचे शरीराला आजारांपासून कसे दूर ठेवावे ते पाहूया. (Sadhguru recommends high-water content foods in the diet)

सद्गुरूंचा डाएट प्लॅन कसा असतो?

सद्गुरू दिवसाच्या सुरूवातीला कोमट पाणी घेतातत. याबरोबरच हळद आणि कडुलिंबाची गोळी खातातत. नाश्त्यामध्ये ते  शेंगदाणे, काकडी, कडधान्ये खाणं पसंत करतातत. जर  दुपारच्या जेवणात ताजी फळं, हिरव्या भाज्या, पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार  घेणं पसंत करतता. सद्गुरूंच्यामते असा आहार घेतल्याने शरीर दीर्घकाळ एनर्जेटीक राहते. रात्री जास्त जेवता हलका आहार घेतात.

कुकरमध्ये फक्त १० मिनिटांत करा व्हेज मसाला पुलाव; एकदम सोपी रेसिपी- जेवणाची वाढेल रंगत

वजन कमी करण्यासााठी सद्गुरू जग्गी वासुदेव काकडी खाणं पसंत करतात काही दिवसांपूर्वीच त्यांन व्हिडिओ शेअर करत सांगितले होते की वजन कमी करण्यासह हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ते काकडीचे सेवन करतात.  काकडी खाणं पाणी पिण्यापेक्षाही जास्त फायदेशीर असते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.  शरीराचे पीएच संतुलनेतही व्यवस्थित राहते. सद्गुरूंच्यामते वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करू शकता. 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा अनेक प्रकारे आजारात समावेश करू शकतात. यासाठी काकडीचे  तुकडे करून त्यात लिंबू, काळं मीठ घालून खाऊ शकता. याव्यतिरिक्त घरात काकडीचा ज्यूस बनवूनही पिऊ शकता.  काकडीत वेगवेगळ्या भाज्या मिसळून सॅलेडच्या स्वरूपातही खाऊ शकता. यातून शरीराला पोषक तत्व मिळण्याबरोबरच वजन कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य