Join us  

सारा अली खानने फक्त २ आठवड्यात केले वजन कमी, तिचे डाएट ट्रेनर सांगतात कसे केले डाएट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 12:20 PM

Diet Plan Of Sara Ali Khan: सारा अली खानसारखी स्लिम ट्रिम फिगर पाहिजे असेल तर काय खायचं आणि काय टाळायचं, याविषयी सांगत आहेत तिचे फिटनेस- डाएट ट्रेनर डॉ.  सिद्धांत भार्गव...

ठळक मुद्देडॉ. सिद्धार्थ यांनी सांगितलं की सारा नुकतीच लंडनला व्हॅकेशनसाठी गेली होती. तिथून आल्यानंतर तिचं वजन थोडं वाढलं होतं.

सारा अली खान चित्रपटसृष्टीत येण्याआधी चांगलीच गुटगुटीत होती. पण या क्षेत्रात पदार्पण करण्यापुर्वी तिने स्वत:मध्ये प्रचंड बदल घडवून आणले आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वजन खूप कमी केलं. आता तिच्यासारखी स्लिम फिगर मिळावी, म्हणून अनेक जणी झटत असतात. साराने मनिष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत नुकतीच उपस्थिती लावली होती. त्यावेळचे तिचे फोटो पाहून तर तिच्या चाहत्यांनी तिच्या फिटनेसचं आणि फिगरचं पुन्हा कौतूक केलं आहे (diet plan Of Sara Ali Khan for getting in shape fast). तिच्या याच फिटनेसविषयी आणि मेंटेन्ड फिगरविषयी सविस्तर सांगत आहेत तिचे डाएट ट्रेनर डॉ.  सिद्धांत भार्गव. (Sara Ali Khan's diet trainer reveals her diet plan)

 

Mid-day यांच्याशी बोलताना डॉ. सिद्धार्थ यांनी सांगितलं की सारा नुकतीच लंडनला व्हॅकेशनसाठी गेली होती. तिथून आल्यानंतर तिचं वजन थोडं वाढलं होतं.

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

पण तिच्या हातात असणाऱ्या पुढच्या काही प्रोजेक्टसाठी तिला २ आठवड्यात वजन कमी करणं गरजेचं होतं. त्यामुळे मग त्यांनी सगळ्यात आधी तिच्या डाएटमधल्या कॅलरी कमी केल्या. साराच्या आहारात दररोज साधारण १७०० कॅल्री असतात. त्यांनी वेटलॉससाठी हे प्रमाण १२०० पर्यंत खाली आणलं. पण याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून प्रोटीन्सचं प्रमाण मात्र वाढवलं. 

 

सध्या तिच्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप मर्यादित असतं. दिवसांतून एकाच जेवणात ती कार्बोहायड्रेट्स घेते.

औक्षणाची सुंदर थाळी घ्या कमी किमतीत, बघा ३ सुबक पर्याय- औक्षणाचा कार्यक्रमाला येईल खास नूर

त्याशिवाय १०० ग्रॅम प्रोटीन्स, ७० ग्रॅम कार्ब्ज आणि जवळपास ४० ग्रॅम फॅट तिच्या जेवणात असतं. याशिवाय रोजच्या रोज वर्कआऊट करण्यावरही तिचा भर असतो. आता बघा सारासारखं परफेक्ट स्लिम व्हायचं असेल तर एवढं काटेकोर तोलून- मापून खावं लागेल... पण त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला मात्र गरजेचा आहे. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्ससारा अली खान