सारा अली खान (Sara Ali Khan) हिने आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सारा अली खान आपल्या फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. एकवेळ अशी होती की सारा ही आपल्या लठ्ठपणामुळे खूपच ट्रोल होत होती. त्यावेळी तिच्याबाबत कोणी असा विचारही केला नव्हता की, सारा एवढी स्लिम आणि फिट देखील होऊ शकते. सारा आपला फिटनेस कायम राखण्यासाठी जीममध्ये प्रचंड मेहनत घेते. ती जिममध्ये अनेक तास वर्कआऊट करते तसेच ती आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि डाएटकडेही तितकेच लक्ष देते. वजन कमी करण्यासाठी सारा एक्सरसाइज, डाएट सोबतच एक खास सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक पिते(Sara Ali Khans Morning Detox Water).
तब्बल ४० किलो वजन कमी करणारी सारा अली खान आता बॉलिवूडमधील फिटेस्ट अभिनेत्रीच्या यादीत आहे. साराने आत्तापर्यंत फॅट ते फिट असा तिचा प्रवास अनेक मुलाखतींमध्ये सांगितला आहे. नुकतेच कर्ली टेल्स सोबत झालेल्या मुलाखतीत तिने वजन कमी करण्यासाठी जे सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक ती पीत होती त्याची रेसिपी शेअर केली आहे. रोज सकाळी न चुकता ती हे सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक (Sara Ali Khan's detox Turmeric Spinach water) पीत असल्याचे तिने सांगितले आहे. हे सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक तिची त्वचा, वजन आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींची चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्याचे तिने म्हटले आहे. नक्की सारा असं कोणतं सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक पिते आणि त्याची रेसिपी काय आहे ते पाहूयात( Sara Ali Khan's morning detox Turmeric Spinach Water).
सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक साहित्य :-
१. पालक - ५ ते ७ पानं
२. ओली हळद - १ टेबलस्पून
३. गरम पाणी - १ ग्लास
हिवाळयात नाश्त्याला खावेत असे ५ हेल्दी पदार्थ, वजन होईल कमी - पोटही राहील भरलेलं...
सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक कसं करायचं ?
साराच सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी एक उकळी आणून गरम करावे. या गरम उकळत्या पाण्यात पालकाची पानं आणि ओली हळद किसून घालावी. आता या पाण्याला एका उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. गाळून घेतलेले पाणी म्हणजेच सिक्रेट डिटॉक्स ड्रिंक पिण्यासाठी तयार आहे.
विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...
वजन कमी करण्यासाठी या सिक्रेट डिटॉक्स ड्रिंकचे फायदे...
१. हळदीमुळे पचन क्रिया सुधारते. हळदीतील गुणधर्म पित्ताशयाला पित्तरस निर्माण करण्यास प्रोत्साहन देतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. चयापचय सुधारलं तर वजन कमी होण्यास मदत होते. हळद पाण्यामुळे वजन कमी होतं. वजन नियंत्रित राहातं.
२. पालकाच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, खनिज, प्रथिने, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक द्रव्य असतात. पालकमध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण अधिक असते यासाठीच वजन कमी करण्यासाठी पालकच्या पानांचा रोजच्या आहारात समावेश करावा. त्याचबरोबर, पालकमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. जे त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात मदत करतात. यामुळे आपला चेहरा चमकदार होतो.