Join us  

काळी द्राक्षे खावीत की हिरवी? तब्येतीसाठी कोणती उत्तम, आहारतज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 7:06 PM

द्राक्षं का खावीत? आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी कोणती द्राक्षं खाणं फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात?

ठळक मुद्देकाळी द्राक्षं खाल्ल्यानं त्वचा चमकते.हिरव्या द्राक्षांमध्ये काळ्या द्राक्षांच्या तुलनेत फायबरचं प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी हिरवी द्राक्षं लाभदायक असतात.आरोग्याच्या दृष्टीकोनातून आहारतज्ज्ञ काळ्या आणि हिरव्या द्राक्षांना सारखंच महत्त्व देतात.

बाजारात फळांच्या स्टाॅलवर हिरव्या काळ्या द्राक्षांचे घड दिसले की घेण्याची इच्छा होतेच. पण द्राक्षं घेताना काळे घ्यावेत की हिरवे असा गोंधळ उडतोच. कोणती  द्राक्षं खाणं फायदेशीर असा प्रश्न पडतोच. आहारतज्ज्ञ सांगतात, काळी असोत की हिरवी दोन्ही प्रकारच्या द्राक्षांमध्ये आरोग्यास फायदेशीर गुणधर्म असतात. आहारतज्ज्ञ डाॅ. सुगीता मुटरेजा काळ्या आणि हिरव्या द्राक्षातील गुणधर्म  सविस्तर सांगतात. 

Image: Google

काळी द्राक्षं का खावीत?

1. काळी द्राक्षं डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दृष्टी सुधारण्यासाठी काळ्या द्राक्षांची मदत होते. 2. काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम असतं. हदयाच्या आरोग्यासाठी काळी द्राक्षं फायदेशीर असतात. द्राक्षांमध्ये साइटोकेमिकल्स नावाचा घटक ह्रदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचा  असतो. 3. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असलेलं ई जीवनसत्वं काळ्या द्राक्षांमध्ये असतं. काळी द्राक्षं खाल्ल्यानं त्वचा चमकते.

Image: Google

4. रोगप्रतिकारशकक्ती चांगली करण्यासाठी काळ्या द्राक्षातील क जीवनसत्व उपयोगी पडतं. 5. काळी द्राक्षं खाल्ल्यानं शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते. 6. किडनीचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी, शारीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी काळी द्राक्षं खाणं फायदेशीर असतात. 

Image: Google

हिरवी द्राक्षं का खावीत?

1.काळ्या द्राक्षांप्रमाणेच हिरव्या द्राक्षांमध्येही वेगवेगळे गुणधर्म असतात. हिरव्या द्राक्षांमध्ये काळ्या द्राक्षांच्या तुलनेत फायबरचं प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी हिरवी द्राक्षं लाभदायक असतात. तसेच फायबरच्या चांगल्या प्रमाणामुळे पोट स्वच्छ होण्यास हिरवी द्राक्षं मदत करतात. 2.हिरव्या द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स जास्त असतात. त्यामुळे वयाचा मेंदूवर होणारा परिणाम कमी होतो.3.शरीरातील रक्त वाढवण्यासाठी हिरवी द्राक्षं फायदेशीर ठरतात. हिरवी द्राक्षं खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. 

Image: Google

काळ्या हिरव्या  द्राक्षांमध्ये  काय असतो फरक?

आरोग्याच्या दृष्टीकोनातून बघता काळी आणि हिरवी द्राक्षं दोन्ही महत्वाची असतात. पण मग काळ्या द्राक्षांमध्ये नेमका फरक काय? असाही प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर देताना डाॅ. सुगीता मुटरेजा म्हणतात की काळ्या आणि हिरव्या द्राक्षांमध्ये पिग्मेंटसचं अंतर असतं. काळ्य एंथोसायनिन हे द्रव्यं जास्त असतं. काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या द्राक्षांच्या तुलनेत कलर केमिकल्स जासत असतात. तसेच काळ्या द्राक्षांची गुणवत्ताही चांगली असते. कोलेस्टेराॅल नियंत्रणासाठी दोन्ही प्रकारची द्राक्षं लाभदायक असतात.  वैशिष्ट्यांचा विचार करता हिरव्या आणि काळ्या द्राक्षांमध्ये फरक असतो. पण खाण्याच्या दृष्टीकोनातून विचार करताना काळ्यापेक्षा हिरवी बरी किंवा हिरव्यापेक्षा काळी द्राक्षं खाणं जास्त लाभदायक म्हणणं चुकीचं असून दोन्ही प्रकारची द्राक्षं खाल्ल्याने आरोग्यास काही ना काही लाभच होतात. त्यामुळे डाॅ. सुगीता मुटरेजा काळी आणि हिरवी द्राक्षं फरक न करता खाण्याचा सल्ला देतात. 

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना