Join us  

सकाळच्या घाईत तुमच्याकडूनही ब्रेकफास्ट स्कीप होतो? तज्ज्ञ सांगतात, असं होत असेल, तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 2:27 PM

Should One Skip Breakfast Rujuta Divekar Give Some Diet Tips : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर ब्रेकफास्ट टाळण्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात

ठळक मुद्देब्रेकफास्ट न करण्याची अनेक कारणं असू शकतात, मात्र असे करण्याचे तोटे असून आरोग्यावर त्याचा अतिशय वाईट परीणाम होतो.पॅकेट ब्रेकफास्ट घेण्यापेक्षा घरात तयार केलेला ताजा ब्रेकफास्ट खाणे केव्हाही चांगले. 

ब्रेकफास्ट हा आपल्या दिवसभरातील सगळ्यात पहिले खाणे असते. त्यामुळे हा ब्रेकफास्ट काय असावा, किती असावा, तो कोणत्या वेळेला घ्यावा याबाबत बऱ्याच चर्चा होताना दिसतात. अनेकदा सकाळच्या घाईत ब्रेकफास्ट करणे शक्य होतेच असेही नाही. किंवा काही वेळा आपण दोन जेवणांमध्ये जास्त गॅप असलेले डाएट फॉलो करत असल्याने आपण ब्रेकफास्ट न करता थेट जेवणच करतो. आता आपल्या सोयीनुसार किंवा कोणाच्या सांगण्यानुसार आपण हे फॉलो करत असलो तरी असे करणे योग्य आहे की नाही याबाबत मात्र आपण पुरेशी माहिती घेतलेली नसते. वजन कमी करण्यासाठी किंवा सकाळच्या वेळी भूकच लागत नाही म्हणूनही अनेक जण ब्रेकफास्ट करत नाहीत (Should One Skip Breakfast Rujuta Divekar Give Some Diet Tips). 

(Image : Google)

मात्र असे करणे आरोग्यासाठी फायद्याचे असते की नसते याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. नुकतीच त्यांनी ‘Should I Skip...’ ही नवीन सिरीज सुरू केली असून या माध्यमातून त्या आपल्यासोबत काही महत्त्वाची माहिती शेअर करत आहेत. याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी ब्रेकफास्ट स्कीप करण्याबद्दल माहिती दिली आहे. असे करणे योग्य असते का? त्याचे शरीरावर काय परीणाम होतात याविषयी अतिशय विस्तृत माहिती देतात. ऋजूता यांचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स असून त्यांनी सांगितलेल्या आहारविषयक टिप्स बरेच जण फॉलोही करतात. पाहूयात ब्रेकफास्ट न करण्याविषयी त्या काय सांगतात...

१. ब्रेकफास्ट अजिबात टाळू नये.

२. ब्रेकफास्ट वगळल्याने किंवा दोन जेवणांमध्ये जास्त गॅप ठेवल्याने वजन झटपट कमी होतेच असे नाही.

३. तर ब्रेकफास्ट स्कीप केल्याने अचानक खूप भूक लागणे, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, घाबरल्यासारखे होणे, डोकेदुखी, भूक न भागणे, मासिक पाळीतील अनियमितता अशा समस्या निर्माण होतात. 

४. तसेच ब्रेकफास्ट केला नाही तर स्नायूंची प्रथिनांचे शोषण करण्याची क्रिया मंदावते. 

५. शरीरात सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिन, बी १२, व्हिटॅमिन डी  यांची पातळी कमी होण्याची शक्यता असते. 

६. पॅकेट ब्रेकफास्ट घेण्यापेक्षा घरात तयार केलेला ताजा ब्रेकफास्ट खाणे केव्हाही चांगले. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य