Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्याकरीता पाणी थंड प्यावे की गरम? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का?

वजन कमी करण्याकरीता पाणी थंड प्यावे की गरम? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का?

Should you drink hot or chilled water for weight loss? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का? पाण्यात काय मिक्स करून प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 07:17 PM2023-07-10T19:17:08+5:302023-07-10T19:18:04+5:30

Should you drink hot or chilled water for weight loss? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का? पाण्यात काय मिक्स करून प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

Should you drink hot or chilled water for weight loss? | वजन कमी करण्याकरीता पाणी थंड प्यावे की गरम? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का?

वजन कमी करण्याकरीता पाणी थंड प्यावे की गरम? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का?

वजन वाढीची समस्या ही सध्या जागतिक समस्या बनली आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील मुख्य कारण म्हणजे बिघडलेली लाईफस्टाईल. बैठी जीवनशैलीमुळे साहजिक वजन झपाट्याने वाढणार. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं विविध सल्ले देतात. काय खावे - काय टाळावे याबाबतीत माहिती देतात. तर काही थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात.

यासंदर्भात, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी गरम पाणी पिऊन वजन कमी कसे होते? थंड पाणी ऐवजी गरम पाणी का प्यावे? गरम पाण्यात काय घालून प्यायल्याने वजन कमी होते? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहे(Should you drink hot or chilled water for weight loss?).

आयुर्वेदानुसार थंड पाणी पिणे टाळावे

मुनमुन सांगतात, ''आयुर्वेदानुसार आपण फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नये, कारण ते पाचक अग्नी कमी करते. त्यामुळे अन्न पचण्यात अडचण होते, ज्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. जर आपण वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असाल तर, या कामात थंड पाण्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकते.''

मुठभर शेंगदाणे गुळाच्या खड्यासह खाण्याचे ५ फायदे, आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा

गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते

गरम पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे अनेकांना सकाळी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा आपली पचनशक्ती तीव्र होते, व अन्न कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज पचते. यासह मेटाबॉलिज्म वाढते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शरीरातील चरबी कमी होते

गरम पाण्यामुळे शरीरातील चरबीचे लहान तुकडे होतात, ज्यामुळे पचनसंस्थेला ते बर्न करण्यास सोपे जाते. याशिवाय जेवणापूर्वी गरम पाणी प्यायल्यास पोट भरलेले वाटते, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दिवसाला ६ हजार पाऊले चालूनही वजन कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागचं महत्त्वाचं कारण..

लिंबू पाणी पोटाची चरबी कमी करते

जर आपल्याला पोटाची चरबी कमी करायची असेल तर, गरम पाण्यात थोडे लिंबू आणि मध घालून प्या. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते, व वजन कमी होण्यास मदत होते.

जंक फूड खाल्ल्यानंतर गरम पाणी प्या

जर आपण जंक फूड खात असाल तर, त्यानंतर गरम पाणी प्या. हे शरीर आतून स्वच्छ करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

Web Title: Should you drink hot or chilled water for weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.