Join us  

श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 2:04 PM

Shravan Somvar Fast: श्रावणातले उपवास करताना नेहमीच ॲसिडीटी वाढण्याचा त्रास होत असेल तर हे काही उपाय करून पाहा...(why does fasting cause acidity?)

ठळक मुद्देउपवासाच्या दिवशीचा सगळा भार साबुदाण्यावर नको. इतर फायबरयुक्त पदार्थही त्याच्यासोबतच पाहिजेतच. 

श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडची व्रतवैकल्ये सुरू होतात. एकानंतर एक सण येतात. त्यामुळे मग त्यानिमित्ताने या महिन्यात उपवास ओघाने आलेच. श्रावणी सोमवारचे व्रतही अनेक जण आवर्जून करतात (Shravan Somvar Fast). अनेक जण तर श्रावणात एक भुक्त म्हणजेच दिवसांतून एक वेळच जेवण करणे, असाही उपवास करतात. हौसेने, श्रद्धेने या दिवसांत उपवास तर केले जातात. पण त्याचा त्रास उपवासाच्या दुसऱ्यादिवशी जास्त दिसून येतो. अनेकांची ॲसिडीटी वाढते (why does fasting cause acidity?). त्यामुळे मग डोकं दुखणं, अंग जड पडणे, करपट ढेकर, तोंडात आंबट पाणी येणे, असा त्रास होतो. उपवासानंतर असा त्रास होऊ नये म्हणून काय करावं ते पाहा..(remedies to avoid acidity after fasting in shravan)

 

उपवासामुळे ॲसिडीटी वाढू नये यासाठी उपाय

उपवासामुळे ॲसिडीटी का वाढते, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की उपवासाच्या साबुदाणा खिचडी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. काही जण तर केवळ साबुदाणा खिचडी खाऊनच उपवास करतात.

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे पती सांगतात हृदयाच्या मजबुतीसाठी ५ व्यायाम- हृदयरोगाचा धोका टळेल

आणि त्यामुळेच खरा त्रास सुरू होतो. सगळ्यात मुख्य म्हणजे साबुदाणा हे एक प्रोसेस्ड फूड आहे. त्यामुळे त्यातून खरं तर काही पोषण मिळत नाही. दुसरं म्हणजे साबुदाणा खिचडी तयार करताना आपण त्यात दाण्याचा कूट आणि भरपूर तेल किंवा तूप घालतो. या दोन पदार्थांमुळे ॲसिडीटी वाढते. 

 

त्यामुळेच जर तुम्ही उपवासाच्या दिवशी दाण्याचा कूट आणि तेल- तूप घातलेली साबुदाणा खिचडी खाणार असाल तर त्याच्या जोडीला काहीतरी फायबरयुक्त आहात घ्या. यामध्ये तुम्ही फळं, रताळी, भगर असे पदार्थ खाऊ शकता.

कमी वयातच चेहरा वयस्कर दिसतो-वजनही वाढलं? प्या केशराचं पाणी, बघा ५ जबरदस्त फायदे

दाणे आणि तेल- तूप यांच्यामुळे शरीरात तयार होणारे ॲसिड शोषून घेण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांची गरज असते. नेमके तेच आपल्याला नाही मिळाले तर मग ॲसिडीटी वाढते. म्हणूनच उपवासाच्या दिवशीचा सगळा भार साबुदाण्यावर नको. इतर फायबरयुक्त पदार्थही त्याच्यासोबतच पाहिजेतच. 

 

टॅग्स :श्रावण स्पेशलनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३हेल्थ टिप्सअन्न