मंजिरी कुलकर्णीआहारतज्ज्ञ
आयुर्वेदामध्ये उपवास करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे उपवास करण्याच्या मागे २ कारणं असतात. एक म्हणजे धार्मिक कारण आणि दुसरे म्हणजे आरोग्यासाठी असणारे कारण. उपवास करताना थोडी काळजी घेतली तर त्याचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप चांगले परिणाम दिसून येतात (perfect method of doing fast for getting health benefits and weight loss). उपवास केल्यानंतर आपल्याला अशक्तपणा येईल किंवा आपल्याला केस गळणे चालू होईल असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. पण असे नाही. उलट योग्य पद्धतीने उपवास केला तर त्याचे खूप फायदे तुम्हाला मिळू शकतात. (how to do fast in shravan?)
उपवास केल्यामुळे नेहमीपेक्षा कमी कॅलरीज तुमच्या शरीरात जातात. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा हलकेपणा येतो आणि म्हणूनच एकाग्रता वाढून मनाची शांतता मिळायला सुरुवात होते. श्रावणामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते.
पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले? खोबऱ्याचा करा खास वापर- चेहरा होईल स्वच्छ- नितळ
मुळातच भूक कमी लागते. याचाच अर्थ आपले लिव्हर स्वतःला डिटॉक्स करत असते. लंगन म्हणजे कमी खाणे हा लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचा एक उत्तम मार्ग आहे. आपल्याकडे बरेच लोक श्रावणामध्ये एक वेळ जेवण करतात. त्याला एकभुक्त असे म्हणतात आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही उत्तम रीतीने स्वतःची हेल्थ मिळवू शकता.
एकभुक्त उपवास करण्याची योग्य पद्धत
१. उपवास करत असताना पाणी किंवा ताक भरपूर प्रमाणात प्यावे.
पूर्ण झोप घेऊनही सकाळी फ्रेश वाटत नाही? ४ कारणांमुळे आळस, थकवा जाणवू शकतो- बघा उपाय
२. बरेच लोक उपवास करत असताना एक वेळ जेवण करतात आणि एक वेळ उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाणा आणि भरपूर फळं खातात जे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे एक वेळच्या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी यांचा समावेश करावा आणि दुसऱ्या वेळेला दिवसभरात जर भूक लागली तर त्यामध्ये ताक, लिंबू पाणी, कोकम ही पेय किंवा फळांमध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, अननस खावी.
३. ज्यांना किडनीचे त्रास किंवा कुठलेही इतर आजार नाहीत त्यांनी नारळ पाणी घेणे योग्य ठरते.
४. फारच भूक लागली तर राजगिऱ्याच्या लाह्या किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा, दशमी तुम्ही घेऊ शकता.
शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी ५ हिरवी पानं, हृदयरोगाचा धोका कमी करायचा तर...
५. ज्यांना उपवास करणे शक्य नाही पण तरीसुद्धा पोटाला आराम देण्याची इच्छा आहे ते लोक धान्य भाजून शिजवलेले अन्न खाऊ शकतात. ते पचायला हलके असते.
६. ज्यांना मायग्रेन, लिव्हर, किडनी, हृदयाचे आजार आहेत, ज्या व्यक्ती खूप अशक्त आहेत त्यांनी आणि गरोदर महिलांनी उपवास करू नये.