Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिण्याची सवयही तोट्याचीच, दिवसभरात किती लिंबू पाणी प्यावं?

वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिण्याची सवयही तोट्याचीच, दिवसभरात किती लिंबू पाणी प्यावं?

लिंबू पाणी प्याल्यानं (lemon water) वजन कमी होतं म्हणून सारखं लिंबू पाणी पिता का? सारखं लिंबू पाणी प्याल्यानं आरोग्यास फायद्याच्या ऐवजी तोटाच (side effects of drinking excess lemon water) होतो. त्वचा, दात, पोटाच्या आरोग्यासाठी जास लिंबू पाणी पिणं घातक ठरतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 03:39 PM2022-07-27T15:39:33+5:302022-07-27T15:48:56+5:30

लिंबू पाणी प्याल्यानं (lemon water) वजन कमी होतं म्हणून सारखं लिंबू पाणी पिता का? सारखं लिंबू पाणी प्याल्यानं आरोग्यास फायद्याच्या ऐवजी तोटाच (side effects of drinking excess lemon water) होतो. त्वचा, दात, पोटाच्या आरोग्यासाठी जास लिंबू पाणी पिणं घातक ठरतं.

Side effects of drinking excess lemon water... | वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिण्याची सवयही तोट्याचीच, दिवसभरात किती लिंबू पाणी प्यावं?

वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिण्याची सवयही तोट्याचीच, दिवसभरात किती लिंबू पाणी प्यावं?

Highlightsअति प्रमाणात लिंबू पाणी प्याल्यानं त्याचा परिणाम दातांवर होतो.पोटासाठी फायदेशीर असलेलं लिंबू पाणी जास्त प्याल्यास पोटाचे विकार उद्भभवतात. त्वचा आणि हाडांचं आरोग्य जपायचं असेल तर प्रमाणातच लिंबू पाणी प्यायला हवं. 

लिंबू पाणी पिणं ( lemon water) आरोग्यासाठी फायदेशीर असतं. वजन कमी करण्यासाठी, फिट राहाण्यासाठी तज्ज्ञ, सेलिब्रेटी देखील लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. लिंबू पाणी प्याल्यानं (benefits of lemon water)  शरीरात क जीवनसत्व, पोटॅशियम, फायबर हे महत्वाचे घटक जातात. पण म्हणून दिवस्भर, येता-जाता लिंबू पाणी पिण्याची सवय आरोग्यास घातक ( side effects of  drinking excess lemon water)  असल्याचं आहारतज्ज्ञ डाॅ. सुगीता मुटरेजा सांगतात. सारखं लिंबू पाणी प्याल्यानं आरोग्यास फायद्याच्या ऐवजी तोटाच होतो. त्वचा, दात, पोटाच्या आरोग्यासाठी जास्त लिंबू पाणी पिणं घातक ठरतं.

जास्त लिंबू पाणी प्याल्यास..

1. लिंबू हे आंबट फळ आहे. लिंबू जर अधिक प्रमाणात खाण्यात/पिण्यात आलं तर् दात खराब होतात. जास्त लिंबामुळे दाताचा वरचा थर खराब होतो.  काहीही खाल्लं तर दात आंबतात. सळसळतात. दातांच्या आरोग्याचा विचार करता लिंबू पाणी मर्यादित प्रमाणात सेवन करावं. लिंबू पाणी प्याल्यानंतर लगेच ब्रशनं दात घासू नये. दात मुळातच खराब असतील, ठणकत असतील तर लिंबू पाणी पिण्याआधी डाॅक्टररांचा सल्ला घ्यायला हवा.

2. जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्याल्यास मायग्रेनचा त्रास होवू शकतो. लिंबासारख्या आंबट फळांमध्ये असलेले घटक मायग्रेन आणि डोकेदुखीला कारणीभूत ठरतात.  मायग्रेनचा त्रास असल्यास लिंबू पाणी पिण्याआधी एकदा आहार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. 

3. पोटाच्या आरोग्यासाठी लिंबू पाणी पिणं फायदेशीर असतं, पण ते मर्यादित प्रमाणात प्यालं तरच. अधिक प्रमाणात लिंबू पाणी प्याल्यास पोटाशी निगडित अनेक समस्या निर्माण होवू शकतात. जास्त लिंबू पाणी प्याल्यस गॅस्ट्रोएसोफगल रिफ्लक्स आजार, ॲसिडिटी या समस्या निर्माण होतात. उलटी, मळमळ, मूड स्विंग होणं हे त्रासही होतात. जास्त लिंबू पाणी प्याल्यानं छातीत जळजळ होते. छातीत दुखते. 

Image: Google

4. लिंबू हे आम्लधर्मी फळ आहे. ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. लिंबू पाणी जास्त प्याल्यास त्वचेस आग होते. त्वचा कोरडी पडते. त्वचेवर लाल पुरळ येणं, त्वचा कापली जाणं या गंभीर समस्याही उद्भवतात. त्वचा जर जास्तच संवेदनशील असेल तर जास्त लिंबू पाणी पिण्याच त्वचेस त्रास होतो. 

5. हाडांच्या आरोग्यासाठीही जास्त लिंबू पाणी पिण्याची सवय घातक असते. लिंबामधील आम्लधर्मीय गुणांचा परिणाम सांध्यामध्ये असलेल्या सिनोविल फ्लूइड या द्रावावर होतो. सांध्यामध्ये असलेलं वंगणं लिंबातील आम्लधर्मीय गुणधर्म शोषून घेतात. त्यामुळे सांधेदुखी होते, हाडं कमकुवत होतात. 

Image: Google

लिंबू पाणी किती प्यावं?

दिवभरात जास्तीत जास्त 3 वेळा लिंबू पाणी पिणं सुरक्षित मानलं जात असलं तरी एकूण आरोग्याचा विचार करता लिंबू पाणी हे सकाळी एकदाच पिणं वजन कमी करण्यास, दिवसभर उत्साहवर्धक वाटण्यास आणि आरोग्य चांगलं राहाण्यास फायदेशीर असतं. लिंबू ;पाणी प्याल्यानं जर काही समस्या जाणवत असतील तर दिवसातून एकदाच लिंबू पाणी प्यावं. आपल्या रोजच्या आहारात 1 किंवा 2 ग्लास लिंबू पाणी असल्यास भाजी खाण्याचं प्रमाणही जास्त हवं. यामुळे शरीरातील ॲसिडची योग्य पातळी राखली जाते. लिंबू पाणी पितांना दातांना कळ लागत असल्यास, दात आंबत असल्यास स्ट्राॅने लिंबू पाणी प्यावं.  लिंबू पाण्यात थोडं मध घालून प्याल्यास आंबटपणा कमी होण्यास मदत होते. 

Web Title: Side effects of drinking excess lemon water...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.