Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा

दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा

How do I cook rice for weight loss (Bhat khallyane vajan vadhat ka) : भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही हेल्दी राहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 01:06 PM2023-12-04T13:06:01+5:302023-12-05T15:23:19+5:30

How do I cook rice for weight loss (Bhat khallyane vajan vadhat ka) : भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही हेल्दी राहू शकता.

Simple Hacks to Make White Rice Weight loss Friendly : How to cook white rice for weight loss | दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा

दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी लोक भात (White Rice) खाणं बंद करतात तर काहीजण गोड पदार्थ खात नाहीत. भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का किंवा महिनाभर भात खाणं बंद केलं तर वजनात फरक दिसतो का याबाबत अनेक समज गैरसमज लोकांच्या मनात आहेत. (Perfect way to cook rice) दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जातो. रोज भात खाऊनही साऊथचे ठिकाणचे लोक जाड का होत नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचं उत्तर खूप सोपं आहे.(How to Cook Rice the Right Way) संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

 

दक्षिण भारतातील बऱ्याचश्या ठिकाणी पॉलिश न केलेला साधा भात खाल्ला जातो. याशिवाय भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर न करता पातेल्याचा वापर केला जातो. पातेल्यात भात ठेवल्यानंतर त्यावर येणारा फेस असतो तो काढून टाकला जातो नंतर तांदूळ शिजवले जातात. (How to cook white rice for weight loss)

भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही हेल्दी राहू शकता. म्हणजे भातातील अधिकाधिक पोषक तत्व तुम्हाला मिळतील आणि वजनही वाढणार नाही.  १८६ ग्राम पांढऱ्या भातात जवळपास २४२ कॅलरीज, ४.४३ ग्राम प्रोटीन, ३९ ग्राम फॅट्स असतात. ५३.२ ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि ५६ ग्राम फायबर्स असतात.  

भात शिजवताना या चुका टाळा (Common Rice Cooking Mistakes You Should Avoid)

दोन ते तीनवेळा पॉलिश केलेला तांदूळ खाणं, भात व्यवस्थित न शिजवणं, भातावरील फेस आलेलं पाणी न काढणं आणि भात कुकरमध्ये शिजवणं यांसारख्या चुकांमुळे भातातील पोषक मुल्य कमी होतात आणि भात वजन वाढण्याचे कारण ठरतो.  
भातात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. दिवसभराची उर्जा भात खाल्ल्याने मिळते. पांढऱ्या भाताचे पौष्टीक मुल्य वाढवण्यासाठी त्यात भाज्या, डाळी, सोयाबीन मिसळून याचे सेवन करा.

सगळे तांदूळ एकाच प्रकारचे असतात असं अजिबात नाही. तांदूळ विकत घेताना  काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते. नेहमी  चांगल्या क्वालिटीचे लांब तुकड्याचे तांदूळ घ्या. यात छोट्या तांदळाच्या तुलनेत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.  वेट लॉससाठी रात्री न भात खाता दुपारच्यावेळी भात खा. व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस खा.  

Web Title: Simple Hacks to Make White Rice Weight loss Friendly : How to cook white rice for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.