नाश्ता (Breakfast) हे दिवसभरातील सगळ्यात महत्वाच्या अन्नापैकी एक आहे. सकाळी नाश्ता केलात तर बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं. शरीराला पूरेपूर्ण उर्जा मिळते आणि फॅट्ही कमी होण्यास मदत होते. (Weight Loss Breakfast) सकाळच्या नाश्त्याला तर तुम्ही काही पौष्टीक पदार्थ खाल्ले तर वजन कमी करणं फार अवघड वाटणार नाही. (Top 5 Indian Breakfast For Weight Loss)
कमीत कमी वेळात वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. नाश्त्याला तेलकट, तुपकट पदार्थ खाण्यापेक्षा हेल्दी पदार्थ खाल्ले तर सुटलेला पोटाचा घेरही कमी होईल. नाश्ता पोटभर केला तर तुम्हा खूप वेळ भूक लागणार नाही आणि तुम्ही अनावश्यक खाण्यावरही नियंत्रण ठेवाल. (Simple Healthy Breakfast Ideas For Weight Loss)
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, 'नाश्ता स्किप केला तर तुम्हाला दिवसभरासाठी लागणारी पोषक तत्व आणि कॅलरीज मिळत नाहीत. नाश्ता करणं हे हेल्दी लाईफस्टाईलचे साईन असून वेळेवर नाश्ता केल्याने डायबिटीस, हार्ट डिसिजसारख्या आजारांपासून बचाव होतो. ब्रेकफास्टसाठी एकावेळी २५० ते ३०० कॅलरीजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की नाश्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.'
1) इडली
सकाळच्यावेळी खाण्यासाठी इडली हा एक परफेक्ट नाश्ता आहे. इडली चटणी किंवा चहाबरोबर खाऊ शकता. हिवाळ्यात बाजारात ताज्या भाज्या दिसायला सुरूवात होते. तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्यांचा इडलीच्या पिठात समावेश करू शकता.
2) पोहे
पोहे खाल्ल्याने बराचवेळ पोट भरलेलं राहतं. नाश्त्याला तुम्ही पोह्यांचा समावेश करू शकता पोहे एक लो कॅलरीजयुक्त नाश्ता आहे ज्यामुळे वेगाने फॅट्स बर्न होण्यास मदत होते. यात तुम्ही मोहोरी, कढीपत्ता आणि इतर भाज्या घालू शकता.
3) उत्थप्पा
लो कॅलरी डाएटमध्ये तुम्ही रवा आणि दलियाचा समावेश करू शकता. उत्तप्पम बनवताना त्यात शिमला मिरची, गाजर अशा वेगवेगळ्या भाज्या घाला. चटणी किंवा सांबारबरोबर तुम्ही याचे सेवन करू शकता.
4) मूंग डाळ चिला
प्रोटीन्सनी परिपूर्ण मुगाच्या डाळीचा चिला खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून निघते. यात तुम्ही डाळी आणि भाज्या घालू शकता. हा एक लो कॅलरीजयुक्त नाश्ता आहे. ज्याच्या सेवनाने भरपूर पोषण मिळते.
वजन कमी पण पोटाची चरबी वाढली? सकाळी 'हे' पिवळं पाणी प्या; वजन घटेल-चेहऱ्यावर येईल ग्लो
5) बेसन ढोकळा
वजन कमी करण्यासााठी तुम्ही बेसन ढोकळ्याचा आहारात समावेश करा. हा ढोकळा बेसनापासून तयार केलेला असतो. नाश्त्याला ढोकळा खाल्ल्याने तुमची भूक शांत होते आणि सतत काहीतरी खाण्याची आवश्यकता भासत नाही. व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता दूर होते.