ॲसिडिटी झाल्याने अस्वस्थ होणं, डोकं दुखणं, मळमळणं हे सगळे त्रास हल्ली बहुतांश लोकांना सहन करावे लागतात. यात महिलांचं प्रमाण तर मोठं.. जवळपास प्रत्येकीचंच डोकं दुखतं पण ते ॲसिडिटीमुळेही (pudina is the solution for acidity and indigestion) दुखतं, हे अनेकींच्या गावीही नसतं... डोकं दुखू लागलं की लागेचच गोळी घेऊन वेळ मारून नेली जाते. पण असं छोट्या- मोठ्या कारणांसाठी वारंवार गोळ्या घेण्यापेक्षा हा सोपा उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
कोणताही त्रास होत असेल तर तो खूप काळ अंगावर काढू नये, हे अगदी खरंय. पण मग त्या त्रासावर लगेचच्या लगेच मनानेच औषध गोळ्या घेणंही घातकच.. म्हणूनच तर वरील काेणताही त्रास होत असल्यास मनाने कोणतीही औषधं घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय करून बघा.. अपचन, ॲसिडिटी, मळमळ या सगळ्या समस्यांवर पुदिना हा अतिशय गुणकारी ठरतो. पुदिन्यामध्ये मेन्थॉल, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, रायबोफ्लेविन, लोह ही खनिजे मोठे प्रमाणात असतात. त्यामुळे पोटासंदर्भात जर कोणताही त्रास असेल तर आहारातलं पुदिन्याचं सेवन वाढवणं गरजेचं आहे.
पुदिना खाण्याचे फायदे (benefits of eating pudina)१. पुदिन्यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीसेप्टिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे पुदिना अतिशय पाचक मानला जातो. पचन व्यवस्थित झाले तर आपोआपच ॲसिडिटी, मळमळ, कॉन्स्टीपेशन असा त्रास होत नाही.२. ज्या महिलांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांनी एक दिवसाआड तरी पुदिना खायलाच पाहिजे.३. पुदिना खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होणे कमी होते. त्यामुळे साहजिकच वेट कंट्रोलसाठी पुदिना उपयुक्त ठरतो.४. प्रवासात मळमळ, उलटी असा त्रास होत असल्यास पुदिन्याची पानं तोंडात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ५. तोंडाला दुर्गंधी असण्याचा त्रास ज्यांना असतो, त्यांनी पुदिन्याची दोन- चार पाने दिवसातून दोन ते तीन वेळा चावावी.
कसा खावा पुदिना? (proper method of eating pudina?)- वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुदिना खाऊ शकतो. दही खात असाल तर दह्यामध्ये पुदिन्याची ताजी पानं बारीक करून टाका.- कोशिंबीर करत असताना त्यात पुदिन्याची पाने टाका.- पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरे हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात लिंबू पिळा. चवीनुसार मीठ टाकून वरतून फोडणी घाला.. अशा पद्धतीने केलेली पुदिना चटणी जेवताना तोंडी लावा.- ॲसिडिटी, पोटदुखी, मळमळ असा त्रास होत असल्यास पुदिन्याचा काढा पिणंही उपयुक्त ठरतं. यासाठी एक कप गरम पाणी घ्या. त्यात पुदिन्याच्या पानांचा रस अर्धा चमचा टाका आणि हा काढा पिऊन घ्या.