Join us  

पोट खूप सुटलंय-कंबरेचा शेप जाड दिसतो? गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 10:03 AM

Simple Ways To Loss Belly (Proven Reasons Why Fennel Seeds Best For Weight Loss) : पोट कमी करण्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित रुटीन सुरू केले तर त्यांचा जास्तवेळेसाठी फायदा दिसून येईल.

एकदा पोट सुटलं की ते कमी करणं खूप कठीण होतं. (Weight Loss Tips) पोट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय लोक करतात पण लाईफस्टाईलमध्ये बदल न झाल्यामुळे वजन कमी करणं  कठीण होतं. (Belly Fat Loss Tips) जसं की तासनतास बसून काम करणं, सतत चहा कॉफी पिणं, अवेळी जेवणं, नाश्ता स्किप करणं या गोष्टींमुळे पोट सुटत जातं आणि वजनही वाढतं. (Natural Weight Loss Tips)

हे टाळण्यासाठी नेहमीज योग्य प्रमाणात कॅलरीजचे सेवन करावे आणि गरजेपेक्षा जास्त खाऊ नये. (How To Get Rid Of Belly Fat) पोट कमी करण्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित रुटीन सुरू केले तर त्यांचा जास्त फायदा दिसून येईल. (Fennel Seeds is Best For Weight Loss According To Study)

बडीशेपेला  शोप असंही म्हटलं जातं. हा एक सुंगधित मसाला आहे आणि भारतीय घरातील स्वयंपाकघरातील मुख्य पदार्थ आहे. मिठाई तयार करण्यासाठी देखिल हा पदार्थ वापरला जातो. (Simple Ways To Loss Belly ) ही १ औषधी वनस्पती आहे सुरूवातीला फक्त इजिप्शिययन लोक स्वयंपाक आणि औषध म्हणून वापरत असत. बडिशेपेच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. 

राग आला की जीभेवरचा ताबाच सुटतो? सद्गुरू सांगतात १ गोष्ट करा; राग येणारच नाही-आनंदी राहाल

बडिशेपेने  वजन कमी का होते? (How to Use Fennel Seed)

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजीच्या एका संशोधनात  जास्त  वजन असलेल्या महिलांवर 9 महिने अभ्यास  करण्यात आला होता. एका गटाने एका जातीची बडिशेप आणि दुसऱ्या गटाने मेथीचे पाणी प्यायले. (Ref) काही आठवडे त्यांना  जेवण पुरवले जात होते. या अभ्यासात दिसून आसं की बडिशेप इतर प्रकारचे ड्रिंक्स पिणाऱ्याच्या कमी कॅलरीज कन्ज्यूम करतात. या बिया  त्यातील उत्तम फायबर्समुळे पोषक ठरतात. पचनसंस्थेत एक बल्किनंग एजंट म्हणून काम करतात आणि भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बडिशेप फायबर्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यात जस्त, तांबे, फॉस्फरस, मॅन्गनीज आणि फोलेटसह विविध पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सही असतात. बडीशेप  खाल्ल्याने लघवीचा प्रवाह वाढतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत होते.

पोट कमी करण्यासाठी मॉर्निंग रुटीन कसं  असावं? (How to Loss Belly Fat)

पोट आणि वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वेट लॉस ड्रिंक प्यायला तर  तुम्हाला चांगला फरक दिसून येईल. अनेकजण रिकाम्या पोटी मध आणि लिंबाचे पाणी प्या. सगळ्यात आधी उकळत्या पाण्यात  २ चमचे बडिशेप, २ चमचे जीर आणि लिंबाच्या फोडी घाला.  हे पाणी उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर एका ग्लासात काढा आणि या पाण्याचे सेवन करा. यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स