वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेक प्रयोग स्वत:च्या मनानं केले जातात. अमूक गोष्ट केल्यानं वजन कमी होतं म्हणतात हा त्यामागचा तर्क. असाच तर्क रात्री उपाशीपोटी झोपण्यामागे आहे. रात्रीचं जेवण टाळल्यास (skipping dinner) पटकन वजन कमी होतं या समजापोटी अनेकजण रात्री काहीही न खाता झोपतात. हे वारंवार घडल्यास यामुळे वजन कमी होणं राहातं दूर आरोग्याशी निगडित (effects of skipping dinner) अनेक समस्या निर्माण होतात असं तज्ज्ञ म्हणतात. रात्री उपाशीपोटी झोपण्याचे शारीरिक आणि मानसिक ( effects of sleeping with empty stomach) आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे तज्ज्ञ रात्री लवकर हलका आहार घेऊन झोपण्याचा सल्ला देतात.
Image: Google
उपाशी पोटी झोपल्यास
1. रात्री उपाशी पोटी झोपण्याची सवय असल्यास त्याचा झोपेवर वाईट परिणाम होतो. उपाशी पोटी झोपल्यानं अनिद्रेची समस्या उद्भवते. . रात्री उपाशी पोटी झोपल्यानं मेंदू खाण्यासाठी आपल्याला सतत सजग करत राहातो. यामुळे सारखी भूक लागते. पण भूक लागूनही काहीच खाल्लं नाही तर झोप येत नाही. पुढे पुढे झोप न येण्याची ही सवय होवून अनिद्रेची समस्या गंभीर होते. अनिद्रेमुळे वजनावर विपरित परिणाम होतो.
2. रात्री जेवण टाळल्याने, रात्रीचं जेवण नीट न केल्यानं त्याचा वाईट परिणाम चयापचयावर होतो. उपाशी पोटी झोपण्याचा परिणाम म्हणून इन्शुलिनची लेव्हल बिघडते. कोलेस्टेराॅल आणि थायराॅइडची लेव्हल बिघडून आरोग्याशी निगडित समस्या उद्भवतात. योग्य वेळी योग्य आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होवून हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
Image: Google
3. जे रात्री उपाशी पोटी झोपतात त्यांचे स्नायू अशक्त होण्याचा धोका असतो. उपाशी पोटी झोपण्याचा परिणाम प्रथिनं आणि अमिनो ॲसिडच्या कार्यक्षमतेवर होतो. त्याचाच परिणाम म्हणून स्नायू कमजोर व्हायला लागतात. स्नायू मजबूत राहाण्यासाठी योग्य वेळी योग्य आहार घेणं महत्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
4. उपाशी पोटी झोपल्याने त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीचा उत्साह, ऊर्जा आणि कार्यक्षमतेवर होतो. रात्री जेवण करणं टाळल्यास शरीरात ऊर्जा राहात नाही. त्यामुळे अशक्तपणा येतो. थकवा लवकर येतो. हा अशक्तपणा आणि थकवा दीर्घकाळ राहिल्यास ते आरोग्यासाठी घातक असतं.