बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमालीचे वेटलॉस केले आहे. जवळपास १०० किलो एवढे वाढलेले वजन त्यांनी ६० पर्यंत खाली आणले आहे. (Sonakshi had lost almost 30 kg.. See what exercises she did and how much water she drank.)वजन कमी करण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले असतात. जसे की सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीला नेपोकीड म्हणून जेवढे ट्रोल केले गेले त्यापेक्षा जास्त तिच्या वजनावरून तिला टोमणे ऐकावे लागल्याचे तिने अनेकदा सांगितले आहे. सोनाक्षीच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरही लोकांच्या फार नकारात्मक कमेंट्स असतात. मात्र सोनाक्षीने सगळ्यांचे तोंड बंद करत कमालीचे वेट लॉस केले आहे. (Sonakshi had lost almost 30 kg.. See what exercises she did and how much water she drank.)सोनाक्षीने मिरची प्लसबरोबरच्या मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार तिने जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे. ३० किलो कमी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सोनाक्षीने फार कष्ट घेतल्याचे तिने सांगितले.
सोनाक्षीने सांगितले, ती सकाळच्या वेळेत एक लिटर पाणी पिते. दिवसभरातही ती भरपूर पाणी पिते. शरीर डीटॉक्स करण्यासाठी पाणी फार महत्त्वाचे असते. सोनाक्षी अनेक प्रकारचे वर्कआऊट्स करते. सतत काही तरी नवीन शिकण्याचा ती प्रयत्न करते. तिने सुरवात वेटलिफ्टींगने केली होती. योगासने करणे तिच्यासाठी फायदेशीर ठरले. सोनाक्षी रोज पिलाटेस करते तसेच कार्डीओ ट्रेनिंगही करते.
सोनाक्षीचे वजन ९० किलो होते. आता तिचे वजन ६० किलो आहे. तिचे शरीर पुर्णपणे बदलले आहे. सोनाक्षीला इतर कोणत्याही व्यायाम पद्धतींपेक्षा पिलाटेस करायला आवडते, असे तिने सांगितले. पिलाटेस सगळ्यांना करता येतील असे असतात. त्यांचा फायदाही कमाल होतो. सोनाक्षी म्हणते ती एक खवय्या आहे तिला चमचमीत खायला आवडते. मात्र आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते त्याशिवाय वजन कमी होत नाही. सोनाक्षीच्या मते योग्य आहार व व्यायाम करणे हाच योग्य मार्ग आहे.
तुम्हालाही जर वेटलॉस करायचा आहे तर मग पिलाटेस हा प्रकार तुम्हीही करुन बघा. पिलाटेसमध्ये योग, कॅलिस्थेनिक्स आणि बॅले या पद्धतींमधील व्यायाम प्रकार एकत्रित केलेले आहेत. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम प्रकार उपयुक्त ठरतो. त्यामध्ये सुमारे ५० प्रकारचे व्यायाम आहेत. काही अगदी सोपे आहेत. नक्की करुन बघा.