Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट फार सुटलंय-डाएट होतच नाही? नाश्त्याला ५ पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ खा-पटकन कमी होईल

पोट फार सुटलंय-डाएट होतच नाही? नाश्त्याला ५ पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ खा-पटकन कमी होईल

South Indian Foods To Lose Weight (Easy Breakfast Ideas For Weight Loss): दिवसाचे पहिले जेवण म्हणजेच ब्रेकफास्ट हा वजन कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:10 AM2024-02-23T11:10:23+5:302024-02-23T11:37:29+5:30

South Indian Foods To Lose Weight (Easy Breakfast Ideas For Weight Loss): दिवसाचे पहिले जेवण म्हणजेच ब्रेकफास्ट हा वजन कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो.

South Indian Foods To Lose Weight : 5 Healthiest South Indian Dishes To Lose Weight By Experts | पोट फार सुटलंय-डाएट होतच नाही? नाश्त्याला ५ पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ खा-पटकन कमी होईल

पोट फार सुटलंय-डाएट होतच नाही? नाश्त्याला ५ पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ खा-पटकन कमी होईल

वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. (Health Tips) एकदा पोट सुटलं किंवा वजन वाढलं तर ते कमी होत नाही अशावेळी तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून सुटलेलं पोट कमी करू शकता आणि वजन नियंत्रणातही ठेवू शकता. (Healthiest South Indian Dishes To Lose Weight) पोट कमी करणं एखाद्या मोठ्या टास्कप्रमाणे असते. दिवसाचे पहिले जेवण म्हणजेच ब्रेकफास्ट हा वजन कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. नाश्ता करणं टाळलं तर याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. (South Indian Foods To Lose Weight)

इंटरनॅशलन इन्वायरमेंट आणि पब्लिक रिसर्चच्या रिपोर्टनुसार साऊथ इंडियन पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. (Ref) ज्यामुळे कार्डिओवॅस्कुलर आजारांचा धोकाही कमी होतो. वजन कमी  होण्यासह डायबिटीसचा धोकाही टळतो. नाश्त्याला या पदार्थांचे सेवन केल्याने अतिरिक्त फॅट्स जमा होणं  टाळता येऊ शकतं. (Breakfast Ideas For Weight Loss)

डोसा सांभार (Dosa For Weight loss)

वेट लॉससाठी डाएट करणं गरजेचे आहे.  डोसा-सांभारचा डाएटमध्ये समावेश करू शकता. तांदूळ आणि उडीदाच्या डाळीपासून तयार केलेले पदार्थ वजन कमी  करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होत नाही. तुम्ही हा पदार्थ तुम्ही नॉन स्टिक पॅनमध्ये बनवू शकता. जे ऑईल फ्री आणि जास्त हेल्दी राहते. 

इडली (Idli Weight Loss Brekfast)

वेट लॉससाठी तुम्ही इडली चटनी आणि मसाला इडलीचा आपल्या आहारात समावेश करा. इडली बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ, डाळ वाटून बॅटर तयार करा. यात प्रोटीन्सशिवाय पोषक तत्व असतात. ज्याच्या सेवनाने भूक लागत नाही.  प्रोटीन्ससारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे भूक लवकर लागत नाही. 

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

नाचणी बॉल्स (Ragi Ball's)

हेवी आणि हेल्दी पदार्थांबरोबरच तुम्ही रागी बॉल्सचा आहारात समावेश करू शकता.  रागी बॉल्स नाचणीच्या पिठापासून तयार केले जातात. ज्यामुळे लवकर भूक लागत  नाही. 

उपमा (Upma For Weight Loss)

उपमा भाज्या आणि रव्यापासून तयार केला जातो. ब्रेकफास्ट परफेक्ट ऑप्शन आहे.  यात कमीत कमी मसाले आणि कमी तेलाचा वापर केला जातो. जे तब्येतीसााठी हेल्दी ठरते. उपमा करण्यासाठी सगळ्यात आधी रवा भाजून  घ्या. त्यात गरम पाणी घाला. याशिवाय यात भाज्या, मसाले घालून शिजवा.

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

उत्तपम (Utthhpa)

डोसा आणि इडली, उत्तपम हे पदार्थ उडीदाची डाळ आणि तांदूळ भिजवून हा पदार्थ तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स, फायबर्सचा अधिक प्रमाणात सेवन करू शकता. प्रोटीनच्या सेवनाने भूक लागत नाही आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांने वजन वाढण्याचाही धोका नसतो. 

Web Title: South Indian Foods To Lose Weight : 5 Healthiest South Indian Dishes To Lose Weight By Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.