Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सोयाबीन ‘प्रोटीन रिच’ असले तरी आहारात किती प्रमाणात असावे? कसे खावे? काय फायदे-तोटे?

सोयाबीन ‘प्रोटीन रिच’ असले तरी आहारात किती प्रमाणात असावे? कसे खावे? काय फायदे-तोटे?

सोयाबीन प्राेटीन डाएट म्हणून खाण्याचा आग्रह होतो, पण ते किती प्रमाणात आणि कसे खावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 04:04 PM2022-03-18T16:04:49+5:302022-03-18T16:13:39+5:30

सोयाबीन प्राेटीन डाएट म्हणून खाण्याचा आग्रह होतो, पण ते किती प्रमाणात आणि कसे खावे?

soybean in diet, protein rich, but eating daily diet is good? is soy protein good for health? | सोयाबीन ‘प्रोटीन रिच’ असले तरी आहारात किती प्रमाणात असावे? कसे खावे? काय फायदे-तोटे?

सोयाबीन ‘प्रोटीन रिच’ असले तरी आहारात किती प्रमाणात असावे? कसे खावे? काय फायदे-तोटे?

Highlightsआपले पचन, पचनाचे विकास आणि आपण सोयाबीन किती मसालेदार करुन खातो यावरही बऱ्याच गोष्टी ठरतात.

उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून सध्या सोयाबीनची चर्चा आहे. सोयाबीन आहारात असावं म्हणून अनेकजण आग्रही असतात. सोयाबीन खिमा ते पुलाव ते चिली असे अनेक पदार्थ हॉटेलातही केले जातात. मात्र खरंच सोयाबीन आहारात असण्याचे काय फायदे असतात? ते किती खावं? नेहमी खाल्लं तर चालतं का?
अती कुठलाही पदार्थ वाईट हे लक्षात ठेवूनच सोयाबीन आणि त्याचा आहारातील वापर याचाही विचार करायला हवा.

सोयाबीनचे फायदे काय?

१. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात.
२. सोयाबीनमुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं. बीपीचा त्रास असणाऱ्यांनी सोयाबीनचा आहारातील वापर म्हणूनच वाढवणं चांगलं. रक्तात गाठी होण्याचं प्रमाणही कमी होतं.
३. सोयाबीन हाडांसाठीही उत्तम. विशेषत: महिलांनी हाडांच्या दुखण्यात सोयाबीन आहारामध्ये वाढवावे.

४. आपले पचन, पचनाचे विकास आणि आपण सोयाबीन किती मसालेदार करुन खातो यावरही बऱ्याच गोष्टी ठरतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, बेतानं सोयाबीन खावे हे बरे.

कोणते पदार्थ करायला सोपे.
सोयाबीन गव्हात घालून काहीजण दळून आणतात, पण अनेकांना तशी पोळी आवडत नाही. त्यामुळे अन्य पर्याय पाहिलेले चांगले.
१. सोयाबीनच्या वड्यांची भाजी, पुलाव, पराठा, परतून भाज्या घालून सोयाबीन चिली, कोशिंबिरीत सोयाबीन उकडून घालणे , कटलेट हे पदार्थ कमी मसालेदार करता येतात.
२. विविध मसाल्याच्या भाज्या केल्या जातात, तसे सोयाबीन करीही करता येते.
३. सोया टोफू बाजारात मिळते, ते ही पनीरसारखे खाता येईल.
४. सोयाबीनच्या वड्यांचे पर्याय अनेक आहेत, मात्र नियम एकच, अती मसालेदार करुन खाऊ नये.

Web Title: soybean in diet, protein rich, but eating daily diet is good? is soy protein good for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न