Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीत प्या हळद- तुळस घालून खास काढा; वाढत्या वजनावर सहज कन्ट्रोल

थंडीत प्या हळद- तुळस घालून खास काढा; वाढत्या वजनावर सहज कन्ट्रोल

Kadha for winter: हिवाळ्यात सारखी भुक लागते, त्यामुळे भराभर वजन वाढत जातं... असं तुमचंही होतं ना.. म्हणूनच हा काढा प्या... वजन आणि इतर संसर्गजन्य आजार राहतील कंट्रोलमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 06:31 PM2021-12-14T18:31:35+5:302021-12-14T18:32:18+5:30

Kadha for winter: हिवाळ्यात सारखी भुक लागते, त्यामुळे भराभर वजन वाढत जातं... असं तुमचंही होतं ना.. म्हणूनच हा काढा प्या... वजन आणि इतर संसर्गजन्य आजार राहतील कंट्रोलमध्ये...

Special drink for weightloss in winter, tulsi- turmeric and garlic kadha | थंडीत प्या हळद- तुळस घालून खास काढा; वाढत्या वजनावर सहज कन्ट्रोल

थंडीत प्या हळद- तुळस घालून खास काढा; वाढत्या वजनावर सहज कन्ट्रोल

Highlightsदररोज सकाळी एक कप काढा प्या. वजन आणि आजार दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवा. 

हिवाळ्यात आपला जठराग्नी उत्तम असतो. त्यामुळे एक तर हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला आपण खातो ते सगळं व्यवस्थित पचतं आणि छान अंगी लागतं.. म्हणूनच तर मग हिवाळ्यात तब्येतही छान टुणटुणीत होण्याकडे वाटचाल करू लागते. त्यात थंडीच्या दिवसात घरोघरी साजूक तुपातले डिंकाचे, मेथ्याचे लाडूही केले जातात. एवढं सगळं पौष्टिक (healthy food in winter) पोटात जातं आणि दुसरीकडे थंडीमुळे मात्र वर्कआऊट करण्याचा जाम कंटाळा येतो. त्यामुळे मग कधी वर्कआऊट होतं तर कधी नाही... याचा सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि काही दिवसातच आपलं वजन (weight loss in winter) छानपैकी वाढलं आहे, याची जाणीव होऊ लागते. 

 

म्हणूनच तर हिवाळ्यात वजन वाढू नये, आहे ते वजन कंट्रोलमध्ये रहावं आणि शिवाय सर्दी, खोकला, शिंका येणे यासारख्या खास हिवाळी आजारांपासून आपलं संरक्षण व्हावं, म्हणून हिवाळ्यात घ्या हा खास काढा.. काढा बनवायला अतिशय सोपा. दररोज सकाळी एक कप काढा प्या आणि वजन आणि आजार दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवा. 

 

कसा तयार करायचा काढा
How to make healthy kadha in winter

- काढा तयार करण्यासाठी आपल्याला हळद, मिरेपूड, तुळशीची पानं, लिंबाचा रस, गुळ, लसूण आणि सुंठ याचा वापर करायचा आहे. 
- सगळ्यात आधी गॅसवर दिड कप पाणी उकळायला ठेवा.
- या पाण्यात हळद, मिरेपूड, सुंठ पावडर हे सगळे साहित्य एकेक चिमुटभर टाका.
- त्यानंतर लसूणाच्या दोन पाकळ्यांचे लहान लहान काप करा आणि ते देखील या पाण्यात टाका.
- यानंतर तुळशीची ६ ते ७ पाने हातानेच तोडून- तोडून पाण्यात टाका.
- सगळ्यात शेवटी १ टीस्पून गुळ टाका.
- काढा चांगला उकळू द्या. दिड कप काढा उकळून जेव्हा एक कप होईल तेव्हा गॅस बंद करा आणि  गरमागरम काढा प्या. 
- सकाळी रिकाम्यापोटी हा काढा प्यावा..

 

काढा प्यायल्याने होणारा फायदा
Benefits of drinking tulsi- turmeric and garlic kadha

- लसूण, मिरेपुड या पदार्थांमुळे शरीरातील चरबी वितळण्यास म्हणजेच फॅट बर्न होण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारण्यसाठी हा काढा उपयुक्त आहे.
- हळद, तुळस यांच्यामुळे काढ्याचे औषधी गुणधर्म वाढतात. तसेच हिवाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांपासून  आपले रक्षण होते. 
- रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हा काढा उपयुक्त ठरतो.


- गुळामुळे एचबी वाढण्यास मदत होते. 
- रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी हा काढा फायदेशीर असतो.
- चयापचय क्रिया सुधारण्यासाठी या काढ्याची मदत होते. 
 

Web Title: Special drink for weightloss in winter, tulsi- turmeric and garlic kadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.