वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. कुणी भरपूर व्यायाम करून वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतं तर कुणी आहारावर फोकस करतं. पण वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवलं तर ते अधिक जास्त परिणामकारक ठरतं, यात वादच नाही. आता वजन कमी करण्यासाठी (Weight Loss Tips) व्यायाम आणि आहार (exercise and diet) यांच्यासोबतच काही आणखी हेल्दी पर्याय शोधत असाल, तर हे एक वेटलॉस ड्रिंक (weight loss drink) तुम्ही काही दिवस घेऊन बघू शकता. यामुळे चयापचय आणि पचन क्रिया व्यवस्थित होतात आणि वजन कमी करण्यासाठी निश्चितच फायदा होतो.
वजन कमी करण्यासाठी वेटलॉस काढा
१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या health_mantra_official या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
२. वेटलॉस काढा तयार करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून सब्जा, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून मध, १ तेजपत्ता, २ ग्लास पाणी एवढं साहित्य लागणार आहे.
अभिनेत्री श्रिया सरनचं जबरदस्त साडी कलेक्शन, लग्नसराईत तुम्हीही करू शकता तिच्यासारखा स्पेशल लूक
३. सगळ्यात आधी सब्जा २० ते ३० मिनिटांसाठी पाण्यात भिजत घाला.
४. त्यानंतर एका पातेल्यामध्ये २ ग्लास पाणी, तेजपत्ता टाकून ते पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळून जेव्हा १ ग्लास होईल तेव्हा गॅस बंद करा.
५. हे गरम पाणी एका ग्लासमध्ये होता. कोमट झाल्यावर त्यात भिजवलेला सब्जा, मध आणि लिंबाचा रस टाका.
६. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि दररोज सकाळी रिकाम्यापोटी हा वेटलॉस काढा प्या.
हा काढा पिण्याचे फायदे
१. पचन कार्य सुधारण्यास मदत होते.
२. बॉडी डिटॉक्ससाठी हा काढा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
महागामोलाची पैठणी कायम नवीकोरी दिसायची तर करा फक्त ६ गोष्टी, पैठणी कायम राहील नव्यासारखी
३. चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते.
४. हा काढा पिऊन लगेचच वेटलॉस होणार नाही. त्यासाठी ८ तासांची पुरेशी झोप, कोणताही ताण न घेणे आणि जंकफूडपासून दूर राहून संतुलित आहार घेणे या गोष्टीही तितक्याच काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.