वाढतं वजन कमी करणं हे जणू टास्क झालं आहे. वजन कमी करताना डाएट, वर्कआउट प्लॅन नेमका कोणता फॉलो करायचा हा देखील मोठा प्रश्नच असतो. काही वेळेला वजन कमी करत असताना ते कमी होत नसून, वाढत जातं. असं का होतं? म्हणजे डाएट, वर्कआउट करूनही जर वजन कमी होत नसेल तर, काय करावं असा प्रश्न पडतो.
आपल्याकडून नकळत अनेक चुका होतात. या चुकांमुळे आपले वजन कमी होण्याऐवजी भरभर वाढत जाते. या चुकांकडे लक्ष देणं देखील तितकेच गरजेचं आहे. त्या चुकांबद्दल माहिती आहारतज्ज्ञ तियान्यु झांग यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. कोणत्या आहेत त्या ४ चुका पाहूयात(STOP doing these things if you want to lose weight).
स्ट्रेस
धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक गोष्टींच्या स्ट्रेसचा सामना करावा लागतो. तणावामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढते. एस्ट्रोजेनमुळे शरीरात चरबीची पातळी वाढू शकते. एकंदरीत स्ट्रेसमुळे मानसिक ताण तर पडतोच, यासह वजनही वाढू शकते.
नाश्त्यात करा ५ सोपे बदल, पोटावरची चरबी कमी होईल लवकर, वजनही येईल आवक्यात
कमी खाल्ल्याने वाढते वजन
वजन कमी करत असताना लोकं खाणं टाळतात, किंवा कमी खातात. यामुळे देखील वजन वाढू शकते. अनेकदा आपण रात्रीचं जेवण स्किप करतो, व सकाळी प्रचंड खातो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. काही वेळेला कमी खाल्ल्याने वजन तर कमी होते, पण ते काही कालावधीसाठी कमी होते. पुन्हा दुपट्टीने वजन वाढू शकते. त्यामुळे हेल्दी फूड खा.
अपुरी झोप
सध्या लोकांना स्मार्ट फोनचं वेड लागलं आहे. त्यामुळे रात्रीची वेळ लोकं झोपण्यात घालवत नसून, स्मार्ट फोन बघण्यात घालवत आहेत. शरीराला ८ तासांची झोप हवी. झोप पूर्ण न झाल्याने अधिक खाण्याची सवय लागते. यामुळे वजन वाढतं. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे चयापयच क्रिया बिघडते, हे सुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं.
काटेकोर डाएट- भरपूर व्यायाम करुनही वजन कमीच होत नाही? कारण ५ चुका, त्या टाळल्या नाहीतर..
एजिंग
खराब जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. आपण हेल्दी पदार्थ टाळून उलट - सुलट पदार्थ खातो. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. अशा वेळी वजन तर वाढतेच, यासह चेहऱ्यावर सुरकुत्या, कमी वयात चेहरा वयस्कर दिसते. त्यामुळे फास्ट फूड ऐवजी हेल्दी फूड खा.