साखर आरोग्यासाठी घातक आहे. सध्या बीपी, शुगर असे जे काही त्रास कमी वयातच होत आहेत, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे साखरेचा अतिरेक. वाढत्या वजनासाठीही साखर जबाबदार आहे. त्यामुळे साखर कमीतकमी खा किंवा खाणं पुर्णपणेच बंद करून टाकलं तर ते अधिक उत्तम असा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ नेहमीच देत असतात. म्हणूनच तुम्हीही साखर खाणं एकदमच पुर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असाल तर त्याचा त्रास तुमच्या तब्येतीला होऊ शकतो. असं केल्याने तुम्हाला पुढील ५ प्रकारचे त्रास जाणवू शकतात. (Suddenly Stopping Sugar Intake Completely)
साखर खाणं एकदम बंद केल्याने कोणते त्रास होतात?
साखर खाणं एकदम पुर्णपणे बंद केलं तर त्यामुळे कोणते त्रास होऊ शकतात, याविषयीची Rachel Goldman (PhD, FTOS) यांनी दिलेली माहिती verywellmind.com यांनी प्रकाशित केली आहे. त्यामध्ये सांगितलेले त्रास पुढील प्रमाणे...
बीपी- शुगरचा त्रास असेल तर सगळ्यात आधी 'हा' पांढरा पदार्थ बंद करा- मिठापेक्षाही आहे वाईट
१. एन्झायटी किंवा चिडचिडेपणा वाढणे
२. झोपेच्या सवयींमध्ये बदल होणे किंवा रात्री लवकर, शांत झोप न लागणे.
३. नैराश्य आल्यासारखे होणे.
४. मन एकाग्र न होणे. कोणत्याच गोष्टीत लक्ष न लागणे
५. गळून गेल्यासारखं होणे.
६. डोकं सतत दुखणे
साखर बंद करताना काय काळजी घ्यावी?
जेव्हा आपण साखर खाणं एकदम बंद करतो, तेव्हा साखरेच्या स्वरुपातून मिळणाऱ्या कॅलरीज एकदम बंद होतात. त्यामुळे मग वरील पद्धतीचा त्रास जाणवायला लागतो.
घरात दररोज धूप- उदबत्ती लावणं जीवावर बेतू शकतं? बघा याविषयीचं संशोधन काय सांगतं....
त्यामुळे तुम्हीही साखर खाणं एकदम बंद करण्याच्या बेतात असाल तर वरील पद्धतीचा त्रास जाणवू शकतो, याची मनाची तयारी करा. पण शक्य झाल्यास एकदम साखर खाणं बंद करणं टाळलं पाहिजे. त्याउलट साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करावे. त्याने वरील प्रकारचा कोणताही त्रास जाणवणार नाही. किंवा जाणवला तरी त्याचं प्रमाण अगदी सौम्य असेल.