हल्ली वाढत्या वजनाचा प्रॉब्लेम तर बऱ्याच जणांना येत आहे. हल्ली प्रत्येकाचेच कामाचे स्वरुप बदलले आहे. कामानिमित्त सलग कित्येक तास एका जागेवर बसावे लागते. शिवाय शारिरीक हालचालीही खूप कमी झाल्या आहेत. जिभेवरही ताबा राहिलेला नाही. त्यामुळे मग वजन भराभर वाढते. एकदा वजन वाढले की मग आपण डाएटिंग, व्यायाम या सगळ्या गोष्टी सुरू करतो. त्यामुळे इंचेस लॉस नक्की होतो. पण म्हणावे तसे वजन कमी होत नाही. अशावेळी नेमकं कुठे चुकतंय ते कळतही नाही (Struggling with weight despite eating well and exercising). डाएटिंग, व्यायाम तर चालू आहे, आता आणखी काय करावं म्हणजे वजन कमी होईल, असा प्रश्न पडतो (major reason for excess weight gain).. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आहारतज्ज्ञांनी दिलं आहे. (how to do weight loss)
डाएट आणि व्यायाम करूनही वजन का कमी होत नाही?
डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सुरू असूनही तुमचं वजन कमी होत नसेल तर त्यासाठी तुम्ही घेत असलेला ताण जबाबदार आहे, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
भरभरून प्रोटीन्स देणारे ५ शाकाहारी पदार्थ, विकतचे प्रोटीन शेक पिण्यापेक्षा हे पदार्थ खा...
ताण किंवा स्ट्रेस आणि वाढतं वजन यांचा नेमका काय संबंध याविषयी सांगताना त्या म्हणत आहेत की जर तुम्ही खूप जास्त ताण घेत असाल तर तुमच्या शरीरात कोर्टिसॉल हार्मोन तयार होतो. या हार्मोन्सच्या निर्मितीमुळे शरीरात जास्त प्रमाणात ग्लुकोज तयार होते. ते बॅलेन्स करण्यासाठी तुम्हाला गोड खावंसं वाटतं. किंवा सतत काहीतरी तोंडात टाकावं वाटतं. यामुळे गोड तसेच अनावश्यक पदार्थ पोटात जाऊन वजन वाढतं.
दुसरं म्हणजे कोर्टिसोल हार्मोन कोलेस्ट्रॉलपासून तयार होतो. शरीरातले इतर महत्त्वाचे हार्मोन्सही कोलेस्ट्रॉलपासून तयार होतात.
भारतीय हातमाग साडीला विम्बल्डनचा सलाम, पाहा टेनिसच्या जगात व्हायरल झालेली सुंदर पांढरी साडी
जेव्हा कोलस्ट्रॉल जास्तीतजास्त प्रमाणात काेर्टिसोल हार्मोन्सच्या निर्मितीसाठी वापरला जातो तेव्हा इतर हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. त्यामुळेही पोट सुटणे, ओटीपोट वाढणे, वजन वाढणे असा त्रास होतो. त्यामुळे ताण घेऊ नका. ताण आलाच तर काही मिनिटे मेडिटेशन करा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.