Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

Assam's Joha rice can help control diabetes : डायबिटीस असल्यास डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात. तुम्हीसुद्धा भात खाण्याचे शौकिन असाल तर भात खाणं टाळायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:05 PM2023-06-30T12:05:27+5:302023-06-30T13:24:57+5:30

Assam's Joha rice can help control diabetes : डायबिटीस असल्यास डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात. तुम्हीसुद्धा भात खाण्याचे शौकिन असाल तर भात खाणं टाळायला हवं.

Study assam joha rice best for diabetes control sugar level : Assam's Joha rice can help control diabetes | भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

भारतातील लोक न चुकता तांदळाचा आहारात समावेश करतात. भात खाल्ल्याशिवाय एकही दिवस जात नाही. काहीजण डाळ- भात तर काहीजण पुलाव, बिर्याणी या स्वरूपात तांदळाचा आहारात समावेश करतात. पण डायबिटीस असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असेल तर भात कमी खाण्याचा किंवा न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो आणि त्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. (Study assam joha rice best for diabetes control sugar level)

डायबिटीस असल्यास डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात. तुम्हीसुद्धा भात खाण्याचे शौकिन असाल तर साधा भात खाणं टाळायला हवं. एका भारतीय प्रकाराच्या तांदळानं डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होईल. इंस्टिट्यूट ऑफ एंडवांस स्टडी एन सायंस एण्ड टेक्नोलॉजीच्या अभ्यासानुसार आसाममध्ये पिकणारे हे तांदूळ डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (Assam's Joha rice can help control diabetes)

जोहा तांदळाचे फायदे

या तांदळाच्या सेवनानं ब्लड शुगर आणि डायबिटीस नियंत्रणात राहते. दरम्यान या तांदळाचे उत्पादन हिवाळ्यात घेतले जाते. तसंच हे तांदूळ खाणाऱ्यांना डायबिटीस आणि कार्डिओवॅस्क्युलर आजारांचा धोका कमी असतो. अभ्यासात संधोकांना असं दिसून आलं की या तांदळातील अनसॅचुरेडेट फॅटी एसिड्स म्हणजेच ओमेगा-६ आणि ओमेगा-३ अॅसिड अनेक फिजिओलॉजिकल कंडीशन्स  बऱ्या करण्यास मदत  करते.  या तांदळांचा वापर तांदळाच्या भूश्याचं तेल बनवण्यासाठीही केला जातो. 

चव आणि सुगंधासाठी  GI टॅग

जोहा तांदूळ बासमती तांदळापेक्षा कमी नाही. याच्या वेगळेपणामुळे जीआय टॅग दिला आहे. या तांदळाला बासमती तांदूळ असं म्हटलं जातं. सुगंध आणि चवीसाठी हा तांदूळ भारतभरात प्रसिद्ध आहे. शाकाहारी आणी विनग लोकांसाठी हा तांदूळ प्लांट बेस्ड प्रोटीन्सचं काम करतो. 

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर साधा भात खाण्याऐवजी ब्राऊन राईस खा. या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि यात फायबर्स जास्त असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी न चुकता या भाताचे सेवन करायला हवे. 

Web Title: Study assam joha rice best for diabetes control sugar level : Assam's Joha rice can help control diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.