Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Benefits of eating wheat cheek: वर्षातून एक- दोन महिनेच मिळणारा चीक आहे तोपर्यंत भरपूर खाऊन घ्या.. कारण याचे फायदेच एवढे जबरदस्त आहेत की ते तुम्हाला वर्षभर ताजेतवाणे ठेवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 02:01 PM2022-04-21T14:01:57+5:302022-04-21T14:03:15+5:30

Benefits of eating wheat cheek: वर्षातून एक- दोन महिनेच मिळणारा चीक आहे तोपर्यंत भरपूर खाऊन घ्या.. कारण याचे फायदेच एवढे जबरदस्त आहेत की ते तुम्हाला वर्षभर ताजेतवाणे ठेवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

Summer Food: Benefits of eating wheat cheek, or the gehu cheek made for preparing kurdai | Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Highlightsअशक्त व्यक्तींनाही गव्हाचा चीक खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. म्हणूनच तर आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी लोकमत सखीशी बोलताना गव्हाचा चीक खाण्याचे काही जबरदस्त फायदे सांगितले आहेत. 

उन्हाळ्यात घरोघरी वाळवणाची तयारी केली जाते... डाळीचे वडे, कुरडया, खारोड्या, साबुदाण्याची पाळीपानं, साबुदाणा- बटाटा चकल्या असे सगळे पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी. हे सगळे पदार्थ वाळल्यानंतर जेवढे चवदार लागतात, त्यापेक्षाही ते अर्धे ओले असताना खाणं म्हणजे आहाहा.. निव्वळ रसना तृप्तीच.. या सगळ्या पदार्थांमध्ये सुगरणीचा कस बघणारा पदार्थ म्हणजे गव्हाच्या चिकापासून तयार करण्यात आलेल्या कुरडया. चीक नीट शिजला, त्यातलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट असलं तर पुढचा कुरडईचा खेळ जमून येणार...अन्यथा सगळाच गोंधळ.. (gehu cheek is the rich source of calcium)

 

गव्हाचा हा चीक (gavhacha cheek) खरोखरंच खूप पौष्टिक असतो. त्यामुळे तो उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर खाऊन घेतला पाहिजे. चीक हे एक प्रकारचे आपले पारंपरिक सुपरफूड (traditional super food) आहे. त्यामुळे अशक्त व्यक्तींनाही गव्हाचा चीक खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. म्हणूनच तर आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी लोकमत सखीशी बोलताना गव्हाचा चीक खाण्याचे काही जबरदस्त फायदे सांगितले आहेत. 

 

गव्हाचा चीक खाण्याने आरोग्याला होणारे लाभ 
-  शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण साधारणपणे १०० ग्रॅम गव्हाचा चिक घेतला तर त्यातून ४५० कॅलरीज मिळतात.
- चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबुतीसाठी तर तो आवश्यकच आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे  थकवा येणे, सतेज न राहणे, नैराश्य न येणे असेही त्रास जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी चीक भरपूर खा.
- गव्हाच्या चिकातून फॉस्फरस मिळतो. तो संपूर्ण शरीराला ताजेतवाणे ठेवण्यासाठी, थकवा घालविण्यासाठी उपयुक्त असतो. 
- उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि त्यामुळे मग अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात. यातला मुख्य घटक असतो लोह. म्हणून उन्हाळ्यात शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी चीक खावा.
- या व्यतिरिक्त चिकातून प्रोटीन्स आणि स्टार्च स्वरुपातले कार्बोहायड्रेट्सही भरपूर मिळतात.

 

चीक खाताना या गोष्टीही लक्षात ठेवा
- काचेसारखा तुकतुकीत दिसतो तेव्हाच तो चांगला शिजला आहे, असं समजावं. 
- चीक कच्चा राहिला तर तो अपचनाच्या समस्या निर्माण करतो.
- दुध- साखरेपेक्षा गुळाच्या पाण्यात कालवून चीक खाल्ला तर ते अधिक उत्तम.
- चीक शिजताना त्यात तीळ टाका. कारण गव्हातल्या कॅल्शियमचे पचन व्हायला तीळ मदत करतात.
- १५० ते २०० ग्रॅम चीक रोज खाल्ला तरी चालतो. खाण्याची वेळ सकाळी नाश्त्याची असावी. 
रात्री खाण्याचं टाळा. कारण शरीराच्या हालचाली नसतात. त्यामुळे पचायला हलका असला तरी त्यातले पौष्टिक घटक शरीराला योग्य प्रमाणात आणि गरजेनुसार मिळत नाहीत. 

 

Web Title: Summer Food: Benefits of eating wheat cheek, or the gehu cheek made for preparing kurdai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.