Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > करायला सोपं, पौष्टिक आणि चमचमीत, करुन तर पहा झटपट एनर्जी आंबील!

करायला सोपं, पौष्टिक आणि चमचमीत, करुन तर पहा झटपट एनर्जी आंबील!

आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे पण हल्ली तो बराचसा विसरला गेलाय,आज त्यातलाच एक सोपा प्रकार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:55 PM2021-04-23T16:55:11+5:302021-04-23T17:02:17+5:30

आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे पण हल्ली तो बराचसा विसरला गेलाय,आज त्यातलाच एक सोपा प्रकार.

summer maharashtra traditional energy drink- Nachani Ambil. | करायला सोपं, पौष्टिक आणि चमचमीत, करुन तर पहा झटपट एनर्जी आंबील!

करायला सोपं, पौष्टिक आणि चमचमीत, करुन तर पहा झटपट एनर्जी आंबील!

Highlights सरबतं तरी किती पिणार? त्यात जो तो म्हणतो हायड्रेट ठेवा स्वत:ला. तर मग यावर पर्याय काय?

शुभा प्रभू साटम 

भयंकर उन्हाळा, त्यात बाहेर भयंकर उकाडा, त्यात लॉकडाऊन. सगळे घरात डांबले जाणार. अस्वस्थता तर आहेच सर्वत्र. भूक फार लागत नाही. एरव्हीही उन्हाळ्यात सारखं पाणी पाणी होतं, खावंसं वाटत नाही, भाजीपोळी तर नकोच वाटते. सतत शीतपेयं पिणं तर आरोग्याला बरं नाही. सरबतं तरी किती पिणार? त्यात जो तो म्हणतो हायड्रेट ठेवा स्वत:ला. तर मग यावर पर्याय काय?
उन्हाळ्यात भूक नसते या आणि अश्या अनेक तक्रारी परिचयाचा आहेत, खरं तर आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे पण हल्ली तो बराचसा विसरला गेलाय,आज त्यातलाच एक सोपा प्रकार पाहूया..

ज्वारी /बाजरी /नाचणी ची आंबील


ज्याला इंग्रजीत ब्रॉथ म्हणतात तसा हा प्रकार आहे,जाडसर पेय,भूक आणि तहान दोन्ही शमवण्यासाठी.

ते करायचं कसं?

ज्वारी/बाजरी/नाचणी यापैकी कोणतेही पीठ ,उन्हाळ्यात बाजरी उष्ण पडेल असे वाटत असेल तर नाचणी उत्तम, तर हे पीठ एक मध्यम वाटी.
साधारण आंबट ताक पिठाच्या दुप्पट.
आले, लसूण(ऐच्छिक),हिरवी मिरची
फोडणीसाठी जीरं हिंग
मीठ, साखर, कोथिंबीर.
कढईत तूप तापवून त्यात जिरे हिंग घाला.
आता तुम्हाला जे घालयाचेय ते म्हणजे लसूण मिरची आले हे सर्व बारीक चिरून घालावे. किंचित परतून त्यात पीठ ,चांगलं परतून त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून, कच्ची चव गेली पाहिजे,
हे पीठ गार करून त्यात ताक मीठ साखर कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्यावे.
वैयक्तिक चवीनुसार मिरची लसूण यांचे प्रमाण ठरवावे.
ही आंबील पोटाला थंड असतें, नाचणीची असेल तर फारच छान.
उन्हाळ्यात पित्त त्रास होतो त्यांच्यासाठी ही आंबील गुणकारी, महाराष्ट्रात तसेच कर्नाटक भागात ही खाल्ली/प्यायली जाते.
विकतच्या साखर आणि रसायन असणाऱ्या गोष्टीऐवजी हे अस्सल देशी एनर्जी ड्रिंक. झटपट एनर्जी. अगदी डाएटवर असाल तरी पोटभरीचं आणि पौष्टिकही.

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: summer maharashtra traditional energy drink- Nachani Ambil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न