Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Summer Special Food: वेटलाॅसपासून डायबिटीस कन्ट्रोलपर्यंत आणि उन्हाळ्यात एनर्जी बूस्टर म्हणूनही ऊसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदे !

Summer Special Food: वेटलाॅसपासून डायबिटीस कन्ट्रोलपर्यंत आणि उन्हाळ्यात एनर्जी बूस्टर म्हणूनही ऊसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदे !

Benefits of sugarcane juice: सध्या ठिकठिकाणी रसवंती सुरु झाल्या आहेत.. ऊसाचा रस (ganne ka ras) तुम्ही नियमित घेताय की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 01:02 PM2022-04-15T13:02:04+5:302022-04-15T13:02:59+5:30

Benefits of sugarcane juice: सध्या ठिकठिकाणी रसवंती सुरु झाल्या आहेत.. ऊसाचा रस (ganne ka ras) तुम्ही नियमित घेताय की नाही?

Summer Special Food: From Weightless to Diabetes Control, Read 10 Great Benefits of Drinking Sugarcane Juice as an Energy Booster in Summer! | Summer Special Food: वेटलाॅसपासून डायबिटीस कन्ट्रोलपर्यंत आणि उन्हाळ्यात एनर्जी बूस्टर म्हणूनही ऊसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदे !

Summer Special Food: वेटलाॅसपासून डायबिटीस कन्ट्रोलपर्यंत आणि उन्हाळ्यात एनर्जी बूस्टर म्हणूनही ऊसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदे !

Highlights ऊसाच्या रसामुळे चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे वेटलॉससाठी (helps for weight loss) त्याचा फायदाच होतो.

साधारण फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याकडे रसवंती सुरु होतात. या कडाक्याच्या उन्हात दुपार, संध्याकाळ, रात्र अशा कोणत्याही वेळी ऊसाचा रस (sugarcane juice) प्यायला तरी शरीर आणि मन दोन्हींनाही थंडावा मिळतो. पण ऊन्हाळ्यात थंडगार आईस्क्रिम, कुल्फी, वेगवेगळे प्रकारचे शेक, कोल्ड कॉफी, वेगवेगळे कोल्ड्रिंक्स यांचंही भरपूर ॲट्रॅक्शन असतं. त्यामुळे त्यांच्या झगमगाटात मग कुठेतरी आपण ऊसाचा रस विसरून जातो. पण असं होऊ देऊ नका. कारण वाचा ऊसाचा एक ग्लास रस प्यायल्याने आपल्याला किती फायदा होतो ते... (Summer Special Food)

 

ऊसाचा रस पिण्याचे फायदे
१. ऊसाच्या रसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एक ग्लास रस प्यायल्यानंतर तुम्हाला खूप वेळ भूक लागत नाही. तसेच ऊसाच्या रसामुळे चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे वेटलॉससाठी (helps for weight loss) त्याचा फायदाच होतो.
२. ऊसाचा रस हे एक प्रकारचे नॅचरल एनर्जी ड्रिंक (energy drink) आहे. त्यात असणारे ग्लुकोज शरीरासाठी पोषक असते आणि भरपूर एनर्जी देते. त्यामुळे उन्हाळ्यात येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी ऊसाचा रस नक्की प्या.


३. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, मँगनिज ऊसाच्या रसात भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यामध्ये असणारे फ्लेवनाईड्स anti-cancer एजंट म्हणून ओळखले जातात.
४. ऊसाचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पचनसंस्थेचे कार्य मजबूत करण्यासाठी आणि त्यातील संसर्ग दूर करण्यासाठी ऊसाचा रस पिणे फायदेशीर ठरते. वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तरी ऊसाचा रस प्यावा.
५. लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी ऊसाचा रस चांगला मानला जातो. कावीळसारख्या आजारांसाठी ऊसाचा रस हा एक नैसर्गिक उपचार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हा रस अल्कलाईन असल्याने लिव्हरचे कार्य चांगले ठेवण्यासाठी त्याची मदत होते. 


६. ऊसाच्या रसामध्ये असणाऱ्या ग्लुकोजचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे डायबेटीज असणारे लोकही अधूनमधून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऊसाच्या रसाचा आस्वाद घेऊ शकतात.
७. किडनी स्टोन, युरिन ट्रॅक इन्फेक्शन किंवा sexually transmitted diseases असे त्रास असणाऱ्यांसाठीही ऊसाचा रस पिणे उपयुक्त आहे.
८. ऊसाच्या रसामध्ये कोलेस्टरॉल, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे किडनीच्या उत्तम आरोग्यासाठीही ऊसाचा रस प्यावा.
९. त्वचेचा पोत उत्तम राखण्यासाठीही ऊसाचा रस फायदेशीर ठरतो.
१०. ज्या लोकांना तोंडाची दुर्गंधी येण्याचा त्रास असतो, अशा लोकांनीही ऊसाचा रस प्यावा.

 

Web Title: Summer Special Food: From Weightless to Diabetes Control, Read 10 Great Benefits of Drinking Sugarcane Juice as an Energy Booster in Summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.