Join us  

Summer Special: उन्हाळ्यात पिऊन पाहा गारेगार नॉर्थ स्टाइल मसाला शिकंजी! शेफ कुणाल कपूर म्हणतात एकदा प्याल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 6:25 PM

Summer Special Shikanji: उन्हाळ्यात जेवण कमी जातं आणि सारखं काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं... म्हणूनच उन्हाळ्यासाठी ही खास शिकंजी रेसिपी (shikanji recipe) सांगितली आहे शेफ कुणाल कपूर यांनी... 

ठळक मुद्देबाजारात मिळणारे कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा घरी तयार केलेली शिकंजी पिणे कधीही अतिउत्तम. 

शिकंजी हे उत्तर भारतातलं एक प्रसिद्ध पेय... हा लिंबू सरबताचाच एक प्रकार आहे. पण तो अतिशय वेगळ्या पद्धतीने केला जातो. उन्हाळ्यात पाणी पाणी होत असल्यास शिकंजी पिणे अतिशय उत्तम असते. कारण यामध्ये लिंबू, पुदिना, जीरे, धने यांचा वापर केला जातो. हे सगळे पदार्थ शरीराला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतता. खूप उन्हातून आल्यावर काहीतरी थंडगार आणि झटपट प्यावसं वाटत असेल तर कुणार कपूरने (shikanji recipe by Kunal Kapur) सांगितलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामध्ये त्यांनी दोन प्रकारच्या शिकंजी सांगितल्या आहेत. एकामध्ये सोडा आहे तर दुसऱ्यामध्ये सोडा न वापरता रेसिपी करून दाखविण्यात आली आहे. 

 

शिकंजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्यथंडगार पाणी, लिंबू, जीरे व धने पावडर, पुदिना, काळंमीठ, मीरेपूड आणि साखर

कशी करायची शिकंजी?- शिकंजी करण्यासाठी सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये अर्धे लिंबू पिळून घ्या. - त्यामध्ये जिरेपूड, धने पावडर, काळे मीठ, मीरेपूड, दिड चमचा साखर असे साहित्य टाका. - हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- आता पुदिन्याची ८ ते १० कोवळी पाने एका खलबत्त्यात टाका आणि थोडेसे कुटून घ्या.- आपल्याला पुदिन्याची पेस्ट करायची नाही. फक्त पाने कुटायची आहेत. यामुळे पुदिन्याचा छान फ्लेवर आपल्या शिकंजीला येईल.- आता पुदिन्याची पाने आपल्या ग्लासमध्ये टाका. त्यात ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका. वरून थोडंसं पाणी टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. - सोडा असणारी शिकंजी तयार करायची असेल तर पाण्याऐवजी फक्त सोडा टाका. 

 

शिकंजी पिण्याचे फायदे (benefits of drinking shikanji)१. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात असणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.२. जीरेपुड असल्याने शरीराला थंडावा मिळतो.३. पुदिन्यामध्ये अनेक रिफ्रेशिंग घटक असल्याने उर्जा मिळते. अशक्तपणा आला असेल तर थोडी तरतरी मिळते.४. उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास शिकंजी प्यायल्याने कमी होतो.५. बाजारात मिळणारे कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा घरी तयार केलेली शिकंजी पिणे कधीही अतिउत्तम. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल