हाडांमध्ये वेदना जाणवतात, उठायला आणि बसायला त्रास होतो अशी अनेकांची तक्रार असते. (Bone's Pain) आजकाल तरूण वयातच लोकांना हाडांच्या, कंबरेच्या वेदना उद्भवतात. (Health Tips) हाडांची वेळीच काळजी न घेतल्यास ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. (Swami Ramdev Shares Home Remedies And Tips Make Bone Strong) योग गुरू बाबा रामदेव यांनी हाडं मजबूत होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितल्या आहेत. ज्यामुळे हाडं चांगली राहतील आणि हाडांच्या समस्या उद्भवणार नाहीत. (Swami Ramdev Baba Home Remedies And Yoga For Strong Bones)
डाएटमधून कॅल्शियम मिळायला हवं असं पाहा
बाबा रामदेव यांच्यामते हाडांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत नाही. आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवा. योग्य प्रमाणात कॅल्शियम खाल्ल्याने वाढत्या वयात हाडं चांगली राहतात. केल, पालक, नट्स, संत्री अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. डेअरी फूड्स कॅल्शियमनी परिपूर्ण असतात. भारतीय आहारात दही, दूध, पनीर, कॅल्शियम या पदार्थांचा समावेश करा. रोज दूध, दह्याचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
कपभर दुधाचे सेवन करा
दुधात कॅल्शियम भरपूर असते. एक ग्लास दूध रोज प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही. याच कारणामुळे रामदेव बाबा डाएटमध्ये दुधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कपभर दुध हाडं आणि मसल्सच्या कार्य पद्धतीसाठी फायदेशीर ठरते.
व्हिनेगर फायदेशीर
व्हिनेगरमध्ये मॅग्नेशियम असते. ज्यामुळे हाडांना कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते आणि मजबूत मिळेल. अतिरिक्त अॅप्पल सायडर व्हिनेगर पचन आणि आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील पोषक तत्व तब्येतीसाठी चांगले ठरतात.
मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल
कोमट पाण्यात दालचिनी आणि मध
मध आणि दालिचीनी घालून पाणी प्यायल्याने गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो. बाबा रामदेव यांच्यामते एक चमचा मधात दालचिनी मिसळून कोमट पाण्याची पेस्ट बनवून वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतील.
सुकामेवा
सुकामेवा कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. सुकामेवा खनिजांचा भंडार आहे. खनिज हाडांसाठी फायदेशीर ठरतात. वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवण्यासाठी सुकामेवा फायदेशीर ठरतो.
भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....
व्हिटामीन डी
व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी ऊन्हात बसणं फायदेशीर ठरते. व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी सकाळच्या उन्हात बसा. ज्यामुळे योग्य प्रमाणात व्हिटामीन डी मिळते.