Join us  

हा १ आयुर्वेदिक काढा प्या, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी रामदेवबाबांचा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 5:44 PM

Swami Ramdev shares home made kaadha for weight loss : थुलथुलीत पोट, कंबरेचा वाढता आकार यांच्यासाठी करुन पाहा हा उपाय..

वजन वाढीच्या समस्येने आज लहान मुलापासून वृद्ध व्यक्ती त्रस्त आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण कमी करताना बऱ्याचदा नाकीनऊ येतात. वजन कमी करण्याचे सध्या अनेक उपाय बाजारात उपलब्ध आहेत. काही लोकं नैसर्गिकरित्या वजन घटवतात. तर काही जण उत्पादनांचा वापर करून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात (Weight Loss).

जर आपले वजन जिम, व्यायाम, योग आणि डाएट करूनही घटत नसेल तर, योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितलेला एक काढा पिऊन पाहा (Ramdev Baba). हा आयुर्वेदिक काढा प्यायल्याने वजन तर घटेलच शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतील(Swami Ramdev shares home made kaadha for weight loss).

वेट लॉस काढा करण्यासाठी लागणारं साहित्य

कच्ची हळद

आलं

जिरं

मेथी दाणे

रामदेव बाबा सांगतात, वेट लॉसचा अचूक फॉर्म्युला, फॉलो करा फक्त ४ रुल्स; वजन घटणारच..

ओवा

अश्वगंधाची पानं

काढा तयार करण्याची कृती

आयुर्वेदिक काढा तयार करण्यासाठी गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन ग्लास पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात कच्ची हळद, आल्याचा एक तुकडा, जिरं, मेथी दाणे, ओवा आणि अश्वगंधाची पानं घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर ठेवा. ७ ते १० मिनिटानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून एका ग्लासमध्ये काढून घ्या. आपण त्यात मध देखील मिक्स करू शकता. कोमट झाल्यानंतर हे पेय रिकाम्या पोटी पिऊ शकता.

आयुर्वेदिक काढा पिण्याचे फायदे

आलं

आलं शरीरातील कोट्रिसोल हार्मोनची वाढ कमी करण्यास मदत करते. कोट्रिसोल एक स्ट्रेस हार्मोन आहे. या हार्मोनमुळे पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते. अशा स्थितीत आपण आल्याचे सेवन आहारातून करू शकता. आलं नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन मुत्रमार्गाद्वारे बाहेर पडतात.

हळद

भारतीय मसाल्यांमध्ये हळद फार उपयुक्त ठरते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. आपण वजन कमी करण्यासाठी उकळत्या पाण्यात दालचिनी आणि हळद घालून पिऊ शकता.

जिरं

जिरं फक्त फोडणीसाठी नसून, वजन कमी करण्यासही मदत करते. जिऱ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी बायोटिक तत्व आढळतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

मेथी दाणे

मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वेट लॉससाठी प्रभावी ठरते.  प्रोटीन रिच फूड क्रेविंग्स कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे भुक कण्ट्रोलमध्ये राहते. शिवाय फायबरयुक्त पदार्थ पचनक्रियेत मदत करतात.

थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

ओवा

इवल्याशा ओव्यामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. ज्यामुळे चयापचय बुस्ट होते. शिवाय त्यातील घटक न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करण्यास मदत करतात. ज्यामुळे बॉडीमध्ये फॅट स्टोर होत नाही. शिवाय हट्टी चरबी कमी होण्यास मदत मिळते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स