Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally : How To Eat Sweet Potato For Weightloss : 2 ways to eat Sweet potato for weight loss : फक्त उपवासालाच रताळ्याचे पदार्थ खाण्यापेक्षा, एरवी देखील रताळं खाऊन करा वेटलॉस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 15:38 IST2025-04-14T15:19:29+5:302025-04-14T15:38:09+5:30

Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally : How To Eat Sweet Potato For Weightloss : 2 ways to eat Sweet potato for weight loss : फक्त उपवासालाच रताळ्याचे पदार्थ खाण्यापेक्षा, एरवी देखील रताळं खाऊन करा वेटलॉस...

Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally 2 ways to eat Sweet potato for weight loss | रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

सध्या वाढत्या वजनाने सगळेच त्रस्त आहेत. वाढणार वजन कमी करण्यासाठी आपण खाण्या-पिण्याच्या सवयीत अनेक बदल करतो. वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज सोबतच डाएट (How To Eat Sweet Potato For Weightloss) देखील फॉलो करतो. डाएट फॉलो करताना आपण वजन वाढवणारे पदार्थ खाणे बंद करतो. वजन वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये आपण रताळ्याचा (Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally) समावेश करुन, ते खाणंच बंद करतो. परंतु रताळं खाल्ल्याने वजन वाढतं नाही तर उलट कमी होण्यास मदत मिळते. अमेरिकेच्या, National Library of Medicine ने केलेल्या रिसर्चनुसार, रताळं खाल्ल्याने वजन वाढण्याऐवजी कमी होण्यास अधिक मदत मिळते(2 ways to eat Sweet potato for weight loss).

आपल्याकडे रताळं फक्त उपवासालाच खाल्लं जातं. परंतु रताळं हे फक्त उपवासापुरतेच न खाता, एरवी देखील खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. रताळे पचनास अत्यंत हलके असतात. रताळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात आणि नैसर्गिक साखरही उपलब्ध असते. त्यामुळे अधिक काळ एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी रताळ्याचा खूप उपयोग होतो. एकदा पोटभर रताळे खाल्ले की लवकर भुक देखील लागत नाही. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळवण्यास फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला निरोगी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे. 

 वजन कमी करण्यासाठी रताळं कसं फायदेशीर ठरते ? 

रताळ्यात फायबरचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणांत असते. ज्यामुळे रताळं खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होतेच पण जास्त खाणे म्हणजेच गरज नसताना खाण्याची वाईट सवय देखील मोडली जाते. रताळ्यातील फायबर पोटात जाते आणि जेलसारखे पदार्थ तयार करते जे पचन क्रियेचा वेग कमी करते आणि मेटाबॉलिजम संतुलित ठेवते. अशाप्रकारे, रताळं खाऊन हळूहळू वजन कमी करण्यास मदत होते.  विशेषतः जेव्हा आपण रताळं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खातो तेव्हा वजन कमी होण्यास मदत होते. 

खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत... 

रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. याचा अर्थ असा की रताळे खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही, तर ग्लुकोज हळूहळू बाहेर पडते. यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते आणि मधुमेहींना रक्तातील साखरेच्या वाढीपासून आराम मिळतो. रताळं चवीला थोडे गोड असते, परंतु ही नैसर्गिक साखर असल्याने ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीरासाठी हानिकारक ठरत नाही.

विराट कोहलीच्या पोषणतज्ज्ञांनी सांगितली खास युक्ती, ४ सवयी फक्त बदला-फिटनेस मिळवा कोहलीसारखा!

वजन कमी करण्यासाठी रताळं खाण्याची योग्य पद्धत... 

वजन कमी करण्यासाठी रताळं उकडवून किंवा भाजून खाणे अधिक फायदेशीर ठरेल. आपण कोशिंबीर करतो त्यात रताळ्याचे काप करून देखील घालू शकतो. रताळं तळून खाण्याची चूक करु नका, यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. रताळं उकडवून किंवा भाजून घेतल्यावर त्यावर थोडा चाट मसाला, मीठ, काळीमिरी पूड भुरभुरवून आणि वर लिंबाचा रस घालून चाट म्हणून देखील खाऊ शकता. 

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

या शारीरिक समस्या असतील तर रताळं खाऊ नये... 

जर तुम्हांला किडनी स्टोनची समस्या असेल तर रताळ्यामधील असलेले ऑक्सलेट्स ही समस्या अधिक वाढवू शकतात. त्याचवेळी, मधुमेहाच्या रुग्णांनी देखील  मर्यादित प्रमाणात रताळं खाणं योग्य ठरेल, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील शुगर लेव्हल बिघडू शकते.

Web Title: Sweet Potato Surprising Health Benefits That Help Manage Weight & Control Blood Sugar Naturally 2 ways to eat Sweet potato for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.