Join us

'तारक मेहता' फेम दीप्ती साधवानीने केलं तब्बल १७ किलो वजन कमी, बघा डाएट प्लॅन- वेटलॉसचे सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 15:11 IST

Taarak Mehta Ka Oolta Chashma actor Deepti Sadhwani's drastic weight loss : Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Taarak Mehta fame Deepti Sadhwani shares her story behind losing 17 kgs in six months : Taarak Mehta Ka Oolta Chashma's Deepti Sadhwani’s Stunning 17-Kg Weight Loss Transformation : अभिनेत्री, गायिका आणि एन्फ्लुएन्सर दीप्ती साधवानीचा वेटलॉस डाएट प्लॅन...

वाढते वजन ही सध्याची एक खूपच कॉमन समस्या झाली आहे. वाढलेलं वजन कमी करायचं म्हटलं तर फार मेहेनत घ्यावी लागते. अशावेळी काही मोजक्या जणांचे वेटलॉस ट्रान्सफॉर्मेशन (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Deepti Sadhwani shares her story behind losing 17 kgs in six months) पाहून अगदी थक्क व्हायला होत. अनेकदा आपण एखाद्या व्यक्ती मधील वजन कमी झाल्यानंतरचा फरक पाहून इतके वजन कसे काय कमी केले असेल असा विचार करतो. सुप्रसिद्ध टी. व्ही सिरीयल 'तारक मेहता का उलटा चष्मा' मधील 'दीप्ती साधवानी' (Deepti Sadhwani) हिच्या बाबतीत सध्या असेच काहीसे घडत आहे(Taarak Mehta Ka Oolta Chashma's Deepti Sadhwani’s Stunning 17-Kg Weight Loss Transformation).

अभिनेत्री दीप्ती साधवानीने गेल्या ६ महिन्यांत १७ किलो वजन कमी केले आहे. तेव्हापासून ही अभिनेत्री तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे फारच चर्चेत आहे. तिने वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं, त्यासंदर्भात अधिक माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत दिली आहे. तिचा वजन कमी करण्याचा प्रवास हा लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दिप्तीने मागील सहा महिन्यांत तब्बल १७ किलो वजन कमी केले आहे, दीप्तीची वेटलॉस जर्नी नेमकी कशी होती, तिने कोणते डाएट फॉलो केले आणि वजन कमी करण्यासाठी काय काय केले ते पाहूयात.

तारक मेहेता फेम दीप्ती साधवानीने असं केलं वजन कमी...

अभिनेत्री, गायिका आणि एन्फ्लुएन्सर दीप्ती साधवानीने तिचा मागील सहा महिन्यांमधील फिटनेस प्रवास सांगितला आहे. दीप्तीने सांगितलं की वजन कमी करणं हे खूप कठीण होतं. “हे सोपं नव्हतं. या प्रवासात असे अनेक दिवस आले जेव्हा मला वाटलं की आता नाही करायचं. पण मी वेळोवेळी स्वतःला आठवण करून दिली की प्रत्येक लहान गोष्ट या प्रवासात महत्त्वाची आहे. प्रगती मंद गतीने होत होती, पण त्यात सातत्य होते,” असं दीप्ती म्हणाली.

हिवाळ्यात थंडीमुळे हुडहुडी भरते? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते थंडी पळवण्यासाठी खास ३ योगासनं...

दीप्तीने केलं १६ तास इंटरमिटेंट फास्टिंग... 

दीप्तीला वजन कमी करण्यासाठी तिच्या काही आवडीच्या सवयी सोडाव्या लागल्या असल्याचे तिने कबूल केले आहे. दिप्तीने ग्लूटेन-फ्री डाएट सुरू केलं. डाएट दरम्यान तिने गोड पदार्थ आणि साखर खाणं पूर्णपणे बंद केलं होत. प्रोसेस्ड आणि पॅकेजिंग अन्नपदार्थ खायचे सोडले. दिवसभरातील १६ तास इंटरमिटेंट फास्टिंग करणे हा तिचा वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला होता. त्याचबरोबर कॅलरी मोजणे आणि त्यानुसार आहार घेणे, यावर तिने विशेष लक्ष दिलं. या प्रवासात कधी तरी एखाद दिवशी "मी डाएट सोडून मनसोक्त खायची" असं दीप्ती म्हणाली. वजन कमी करण्यापूर्वी दीप्तीचे वजन ७५ किलो होते आणि आता तिचे वजन ५८ किलो आहे. मात्र, हे तिच्यासाठी सोपे नसल्याचे तिने सांगितले, असे असूनही, ती तिच्या वेटलॉस ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यशस्वी झाली आहे. 

दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...

वजन कमी करताना चेहऱ्यावरची चमक गायब? ऋजुता दिवेकरांच्या ३ टिप्स- चेहऱ्यावर ग्लो हवा तर...

एक्सरसाजही तितकाच महत्वाचा आहे... 

दीप्ती आधीही वर्कआउट करायची, पण या प्रवासात तिने काही गोष्टी नव्याने रुटीनमध्ये सामील केल्या. दीप्ती सांगते, “मी माझ्या वर्कआउट रुटीनमध्ये एरियल योग, बॉक्सिंग आणि पोहणे या गोष्टींचा समावेश केला. मुख्य म्हणजे अतिप्रमाणात या गोष्टी न करता त्यात सातत्य ठेवले. यामुळे फक्त माझ्या शरीरात बदलच झाला नाही, तर माझी एनर्जीदेखील वाढली.”

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स