Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सगळ्यांची काळजी घेता स्वतःचीही घ्या, फिट व्हायचं तर तरुणींनी खायलाच हवेत १० पदार्थ

सगळ्यांची काळजी घेता स्वतःचीही घ्या, फिट व्हायचं तर तरुणींनी खायलाच हवेत १० पदार्थ

घरातले, बाहेरचे काम करुन येणारा थकवा नेहमीचाच. अशावेळी आपली काळजी दुसऱ्या कोणी कशाला करायला हवी. आपणच नेहमी योग्य तो आहार घेतला तर आपल्यावर काळजीची वेळच येणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 04:06 PM2021-10-10T16:06:59+5:302021-10-10T16:56:24+5:30

घरातले, बाहेरचे काम करुन येणारा थकवा नेहमीचाच. अशावेळी आपली काळजी दुसऱ्या कोणी कशाला करायला हवी. आपणच नेहमी योग्य तो आहार घेतला तर आपल्यावर काळजीची वेळच येणार नाही...

Take care of yourself and take care of yourself. If you want to be fit, young women should eat 10 foods in the air | सगळ्यांची काळजी घेता स्वतःचीही घ्या, फिट व्हायचं तर तरुणींनी खायलाच हवेत १० पदार्थ

सगळ्यांची काळजी घेता स्वतःचीही घ्या, फिट व्हायचं तर तरुणींनी खायलाच हवेत १० पदार्थ

Highlightsअशक्तपणा येणे, हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे, अंग ठणकणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकतेआहार हा आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याक़डे योग्य वेळी लक्ष देणे आवश्यकदैनंदिन आहारात असायलाच हव्यात अशा काही घटकांची यादी... 

सततचे घरकाम, ऑफीस, सणवार, वेगवेगळ्या गोष्टींचा ताणतणाव, यामुळे अनेकदा आपल्या तब्येतीकडे महिलांचे दुर्लक्ष होते.  त्यातही मासिक पाळीच्याही समस्या काही तरुणींना भेडसावत असतात. या सगळ्यामुळे अशक्तपणा येणे, हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे, अंग ठणकणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कालांतराने या समस्या वाढत जातात आणि अनेकदा उग्र रुप धारण करतात. पण या सगळ्यापासून दूर राहायचे असेल तर वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. आहार हा आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याक़डे योग्य वेळी लक्ष देणे आवश्यक आहे. तरुण वयापासूनच आहारात काही गोष्टींचा नियमित समावेश केल्यास ते फायद्याचे ठरु शकते. पाहूयात तरुणींच्या दैनंदिन आहारात असायलाच हव्यात अशा काही घटकांची यादी... 

दूध -

दूधाला आपल्याकडे पूर्णान्न म्हटले जाते. लहानपणी आपण दूध पितो पण जसे मोठे होतो तसे चहा, कॉफी यांसारख्या पेयांशी आपली ओळख होते आणि दूध पिणे आपण बंद करतो. पण दूधात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे तुमच्या आहारात नियमितपणे दूधाचा समावेश असायला हवा. हे दूध फॅट फ्री असलेले केव्हाही चांगले. दूधामुळे शरीराला केवळ कॅल्शियमच मिळते असे नाही तर त्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही वाढते. दुधामध्ये ड जीवनसत्त्वही असते. त्यामुळे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते. 

क़डधान्ये -

शरीराला याहून उपयुक्त कोणताच घचक नसतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उकडलेल्या एक कप कडधान्यामध्ये १७ ग्रॅम फायबर असतात. तसेच यामध्ये प्रथिने तसेच महिलांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमही पुरेशा प्रमाणात असते. कडधान्यामुळे हृदयरोग, टाइप २ डायबेटीस, उच्च रक्तदाब, स्तनांचा आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.  

सुकामेवा -

सुकामेव्याच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. आक्रोडमध्ये शरीराला आवश्यक असणारे ओमेगा ३ असते. तर जरदाळूमध्ये एक प्रकारचे अमिनो अॅसिड असते, त्यामुळे तुमचा वाढलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते. बदामातही शरीराला आवश्यक असणारे बरेच घटक असतात. वेळ असेल तेव्हा तुम्ही सुकामेव्याचे बारीक काप करुन ठेवले तर ऐनवेळी वेगवेगळ्या पदार्थांवर तुम्ही ते घेऊ शकता. 

जवस -

हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. आहारात नियमितपणे जवसाचा समावेश केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते. जवस रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून तुमचा बचाव करतात.

पालक -

ही अतिशय उपयुक्त अशी पालेभाजी आहे. यात लुटेन नावाचा शरीराला आवश्यक असणारा एक घटक असतो. तसेच यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने महिलांसाठी तो अतिशय उपयुक्त असतो. यातील फोलेट आणि ब जीवनसत्त्वामुळे जन्मजात काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. तसेच हृदयरोग होऊ नये म्हणूनही पालक अतिशय उपयुक्त असतो. 

रताळी - डोळे, त्वचा चांगली राहण्यासाठी आणि मूत्राशयाशी निगडित कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी शरीराला अ जीवनसत्त्वाची गरज असते. रताळ्यांमध्ये याचे प्रमाण अतिशय चांगले असल्याने रताळ्याचा आहारात समावेश करावा. 

लसूण -

पूर्वीपासून आपल्याकडे आहारातील लसणाचे महत्त्व सांगितलेले आहे. लसणाने आहाराला चव, स्वाद तर येतोच पण लसूण अतिशय आरोग्यदायी असतो. त्यामुळे दररोज दोन ते चार लसणाच्या पाकळ्या आहारात असायलाच हव्यात. तसेच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही लसणाची पेस्टही वापरु शकता. 

( Image : Google)
( Image : Google)

अंजीर -

अंजीरात सर्वात जास्त पोटॅशियम असते. अनेकदा हे फळ आपल्या लक्षात येत नाही. पण मध्यम आकाराच्या ६ अंजीरांमध्ये ८९१ मिलिग्रॅम खनिजे असतात जी रक्तप्रवाह कमी करण्यास मदत करतात. अंजीरात कॅल्शियमचे प्रमाणही चांगले असते. 

पेरु आणि सफरचंद -

पेरुला आपल्याकडे अमृत म्हटले जाते. तसेच सफरचंद हे सर्वाधिक हेल्दी फळ म्हणून ओळखले जाते. पेरुमध्ये क जीवनसत्त्व असते. एका मध्यम आकाराच्या संत्र्यात जेवढे क जीवनवसत्त्व असते त्याच्या ५ पट जीवनसत्त्व एका पेरुमध्ये असते. तुम्ही पेरुची स्मूदी करुनही खाऊ शकता. तसेच सफरचंदातील सर्व घटक आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने प्रत्येक मुलीने , महिलेने कायम सफरचंद खायला हवे. 

केळं-

सर्वाधिक पोटॅशिअम असलेले हे फळ भारतात सहज उपलब्ध होते. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात या फाळाचा उपयोग होतो. शिवाय मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालावे यासाठीही हे फळ उपयुक्त असते. एका केळ्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या घटकांपैकी केवळ १० टक्के घटकच मिळतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किती केळी खायची हे ठरवू शकता.  

याशिवायही आणखी बरेच घटक आहेत ज्याचा मुलींनी आणि महिलांनी आपल्या आहारात सममावेश करायला हवा.

Web Title: Take care of yourself and take care of yourself. If you want to be fit, young women should eat 10 foods in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.