Join us  

परफेक्ट डाएट-भरपूर व्यायाम करुनही वजन कमी न होण्याचे ‘हे’ मुख्य कारण, मेण्टल हेल्थवरही होतो परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 9:03 PM

Taking too much stress prevents weight loss : How Stress Can Cause Weight Gain : कितीही डाएट, एक्सरसाइज केले पण स्ट्रेस घेणे बंद केले नाही तर वाढू शकतो लठ्ठपणा...

सध्याच्या काळात वाढते वजन ही एक जागतिक समस्या झाली आहे. अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. निरोगी राहण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वजन वाढल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वाढलेल्या वजनामुळे आपल्या अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. सतत वाढत जाणार हे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करुन बघतो(How Stress Can Cause Weight Gain).

वजन कमी करण्यासाठी आपण प्रामुख्याने एक्सरसाइज आणि डाएट या दोन गोष्टींचा आधार घेतो. आपण वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करतो त्याचबरोबर योग्य डाएट फॉलो करतो. परंतु काहीवेळा असे अथक प्रयत्न करूनही वजनाच्या काट्यावर उभे राहिले की वजन 'जैसे थे' तसेच असते. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण वेळच्यावेळी एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करत असताना देखील आपले वजन कमी कसे होत नाही. एवढे सगळे प्रयत्न करूनही जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. एक्स्पर्ट डॉक्टर, लवलीन कौर यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत खूप मेहेनत घेऊनही वजन कमी न होण्याचे एक खास कारण कोणते, याबद्दल अधिक माहिती दिली आहे(too much stress can prevent weight loss).

एक चुकीची सवय वजन कमी करण्यातला मुख्य अडथळा... 

१. डॉक्टर लवलीन कौर सांगतात की, तुम्ही कितीही मेहनत घेतली, कितीही डाएट फॉलो केले, कितीही एक्सरसाइज केला पण जर का तुम्ही स्ट्रेस (Stress) घेणे थांबवले नाही तर तुमचे वजन इंचभर देखील कमी होणार नाही. ताणतणावामुळे वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो. जेव्हा तुम्हाला दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये असता  जसे की रात्रंदिवस एकाच गोष्टीचा विचार करणे, तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन सोडते. 

२. कॉर्टिसॉल हार्मोन चयापचय क्रियेचा वेग कमी करू शकतो आणि शरीरात चरबी जमा होण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देऊ शकतो. यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते. 

उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या ५ टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

३. बरेचदा आपण स्ट्रेसमध्ये असताना, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खायला सुरुवात करतो, विशेषत: जास्त कॅलरीज असलेले अनहेल्दी पदार्थ आपण खातो. यामुळे देखील वजन वाढते.

४. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला झोप येत नाही आणि झोप न आल्याने तुमच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. शरीराची उर्जा वापरण्याची क्षमता कमी होते आणि यामुळे वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो. 

वजन कमी होणे आणि स्ट्रेस यांचा नेमका संबंध काय आहे ? 

१. मानसिक आरोग्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो, त्यापैकी एक म्हणजे आपले वजन. जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा आपल्या वजनावर होतो. 

२. स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे इतर हार्मोन्सच्या लेव्हलवरही त्याचा परिणाम होतो आणि शरीरातील हार्मोनल बॅलेन्सही बिघडतो. 

 ३. कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात आपल्या शरीरात सोडल्यामुळे शरीरातील इतर हार्मोन्सच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वजन कमी करणे शक्य होत नाही. 

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

वाढलेले वजन-पोटाची ढेरी करेल आल्याचा इंचभर तुकडा, पाहा ‘हा’ जादूई उपाय-सोपा आणि असरदार...

हे काम नक्की करा... 

१. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. जर तुम्ही दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये असाल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी कोणाशीतरी बोला. काही चिंता तुम्हाला त्रास देत असेल तर कोणाशी तरी हे शेअर करा. 

२. स्ट्रेस येण्याची कारणे ओळखा. त्यावर मात करण्यासाठी योग, ध्यानाची मदत घ्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स