Join us  

मेथ्या घालून चहा? पावसाळ्यात रोज प्या हा खास चहा, वजन होईल कमी-पचनालाही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 4:11 PM

वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेक प्रयोग करुन थकला असाल तर करा योग्य आणि सोपा उपाय. वजन कमी करण्यासाठी  मेथीचा चहा (fenugreek tea for weight loss) नियमित प्या. वजन कमी होण्यासोबत या चहाचे (benefits of fenugreek tea) आहेत इतरही फायदे.. 

ठळक मुद्देमेथीच्या चहातील घटक शरीरातील फॅटस बाहेर काढतात. एका अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की, मेथ्यांमध्ये विरघळणाऱ्या फायबरचं प्रमाण भरपूर असतं. याचा उपयोग शरीरातील कोलेस्टेराॅल कमी करण्यास होतो.मेथ्यांचा चहा करण्यासाठी लागणारी मेथी पावडर घरीच तयार करता येते. 

वजन वाढणं ( weight gain problem)  ही एक मोठी समस्या असून या समस्येतून इतर समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी (weight loss)  प्रयोगापेक्षाही योग्य उपाय करणं आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ एक असरदार उपाय सांगतात तो म्हणजे मेथीचा चहा (fenugreek tea) . मेथी म्हणजे मेथ्यांचे दाणे. त्याची पावडर करुन त्याचा चहा नियमित प्यायल्यास वजन कमी तर होतंच  (fenugreek tea for weight loss) शिवाय इतरही फायदे होतात.

Image: Google 

मेथीचा चहा प्याल्यानं...

1. वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा पिणं हा उत्तम उपाय मानला जातो. मेथीच्या चहात डायटरी फायबर, जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. हे घटक शरीरात जमा झालेले फॅट्स बाहेर काढण्यास मदत करतात. मेथीच्या चहामुळे चयापचयाची क्रिया हळूवार होते. त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. मेथीच्या चहातील गुणधर्म मधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर असतात, मधुमेही रुग्णांचं वजनही मेथीचा चहा पिऊन नियंत्रित राहातं.

2. बध्दकोष्ठतेवर मेथीचा चहा उत्तम उपाय आहे.  मेथीच्या चहामध्ये पचनास मदत करणारे घटक असतात. हे घटक बध्दकोष्ठता आणि पोटाशी निगडित इतर समस्या कमी करण्यास मदत करतात. मेथीच्या चहातील गुणधर्म पचन यंत्रणा सक्रीय करतात. पचन उत्तम असल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो. मेथीच्या चहामुळे पचन क्रिया सुधारते. 

Image: Google

3. ज्यांचं कोलेस्टेराॅल जास्त आहे त्यांनी मेथीचा चहा अवश्य प्यायला हवा. एका अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की, मेथ्यांमध्ये विरघळणाऱ्या फायबरचं प्रमाण भरपूर असतं. याचा उपयोग शरीरातील कोलेस्टेराॅल कमी करण्यास होतो. मेथ्यांमध्ये असलेले स्टीराॅइडल सेपोनिन्स आतड्यांमध्ये कोलेस्टेराॅलचं शोषण होण्यास प्रतिबंध करतात. 

4. मेथ्यांच्या पाण्यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे मेथ्यांच्या चहामुळे रक्तदाब सहज कमी होतो. मेथीच्या चहामध्ये असलेले ॲण्टिऑक्सिडण्टस वाढलेला रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. 

5. मेथीचा चहा मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त असतो. या चहामुळे शरीरात साखर आणि कर्बोदकं यांचं शोषण होण्यावर नियंत्रण येतं. मेथ्यांमध्ये फोएनम ग्राइकम नावाचा घटक असतो जो रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. 

Image: Google

मेथ्यांचा चहा कसा करावा?

मेथ्यांचा चहा करणं सोपं काम आहे.  दीड कप पाणी उकळण्यास ठेवावं. यात 1 छोटा चमचा मेथी पावडर घालावी. यात थोडी पुदिन्याची पानंही घालावीत. हे पाणी गॅसच्या मोठ्या आचेवर उकळू द्यावं. पाणी चांगलं उकळलं की ते गाळून घ्यावं. या चहात थोडा लिंबाचा रस घालून प्यावा. हा चहा सकाळी रिकाम्या पोटी प्याल्यास वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते. मेथीचा चहा करण्यासाठी मेथी पावडर घरीच तयार करता येते. यासाठी तव्यावर मेथ्या लालसर भाजून घ्याव्यात. त्या थंड झाल्यावर वाटून घेतल्यास मेथीचा पावडर तयार होते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना