वजन कमी करणं अनेकांसाठी जणू टास्क झालं आहे. वजन जरी कमी झालं तरी मेन्टेन ठेवताना नाकीनऊ येतात. वजन मेन्टेन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे. व्यायाम आणि हेल्दी आहार घेणं बंद केलं तर, वजन दुपट्टीने वाढायला सुरुवात होते. काही कारणास्तव जर आपल्याला व्यायामाचं रुटीन फॉलो करायला जमत नसेल, किंवा आरोग्यदायी आहाराला फॉलो करायला जमत नसेल, तर अशावेळी काय करावं असा प्रश्न पडतो. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोणता रुटीन फॉलो करावा?(The 4 Best Ways to Maintain Weight Loss).
यासंदर्भात, वेट लॉस कोच, डॉक्टर स्नेहल अडसुळे सांगतात, 'अनेकांचं वजन डाएट आणि व्यायाम सोडल्यामुळे पुन्हा झपाट्याने वाढते. परंतु, अशी देखील काही लोकं आहेत, ज्यांचे वजन कमी झाल्यानंतरही मेन्टेन राहते. वजन कमी झाल्यानंतर शरीर मेन्टेन ठेवायचं असेल तर, या ४ टिप्स फॉलो करा.'
हेल्दी डाएट खा
निरोगी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी डाएटला फॉलो करणं गरजेचं आहे. यामुळे आपले अतिरिक्त वजन वाढणार नाही. काही लोकं मेन्टेन राहण्यासाठी एक वेळचं जेवण स्किप करतात. असे करू नका. यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो, त्यामुळे हेल्दी पदार्थ खात राहा.
वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल
खाण्याच्या वाईट सवयी पुन्हा सुरू करू नका
आपल्याला सतत फास्ट फूड, स्वीट डिश खाण्याची वाईट सवय लागलेली असते. ज्यामुळे आपण वजन वाढीकडे अधिक लक्ष देत नाही. वजन कमी करायचं असेल तर, या वाईट सवयींना टाळा. या पदार्थांमुळे वजन झपाट्याने वाढते.
वजनेवर लक्ष ठेवा
आठवड्यातून एकदा वजन चेक करा. सुट्टीवर किंवा सहलीला जाताना आपण मनसोक्त खातो. असे न करता कमी प्रमाणात खा. हेल्दी पदार्थांना प्राधान्य द्या, पण उपाशी राहू नका.
उपाशी राहिल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते, वजन घटते का? 'फास्टिंग' करणे किती फायद्याचे..
वजन कमी झाल्यावर - उलट सुलट खाणं टाळा
'माझे वजन कमी झाले आहे, त्यामुळे आता मी काहीही खाऊ शकते.' असा विचार अनेक लोकं करतात. पण असे करू नका. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वेट लॉस डाएटला स्किप करू नका. अनहेल्दी पदार्थांमुळे वजन झपाट्याने वाढते.