Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटाची चरबी घटवायची, पण व्यायाम नको? ५ फळं खा, झरझर घटेल चरबी-फिट, स्लिम दिसाल

पोटाची चरबी घटवायची, पण व्यायाम नको? ५ फळं खा, झरझर घटेल चरबी-फिट, स्लिम दिसाल

The 5 Best Fruits For Weight Loss : जर तुम्ही वेगानं वाढणाऱ्या वजनाचा ताण घेत असाल किंवा पोट  बाहेर आलं असेल तर या काही फळांचे सेवन केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 09:13 AM2023-09-10T09:13:00+5:302023-09-10T11:54:12+5:30

The 5 Best Fruits For Weight Loss : जर तुम्ही वेगानं वाढणाऱ्या वजनाचा ताण घेत असाल किंवा पोट  बाहेर आलं असेल तर या काही फळांचे सेवन केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

The 5 Best Fruits For Weight Loss : Best fruits for weight loss u can eat this fruits everyday | पोटाची चरबी घटवायची, पण व्यायाम नको? ५ फळं खा, झरझर घटेल चरबी-फिट, स्लिम दिसाल

पोटाची चरबी घटवायची, पण व्यायाम नको? ५ फळं खा, झरझर घटेल चरबी-फिट, स्लिम दिसाल

फळं रोजच्या आहाराचाच एक भाग असतो. यात अनेक पोषक तत्व असतात. रोज फळं खाल्ल्याने आजारांपासून लांब राहण्यास मदत होते आणि गंभीर आजारांचा धोकाही टळतो. काही फळांचा रोजच्या आहारात समावेश केल्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. जर तुम्ही वेगानं वाढणाऱ्या वजनाचा ताण घेत असाल किंवा पोट  बाहेर आलं असेल तर या काही फळांचे सेवन केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. (Best fruits for weight loss u can eat this fruits everyday) याशिवाय फॅट लॉसही होईल.

पपई

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी तुम्ही फळं खाऊ शकता. पपईमध्य पपॅन नावाचे एंजाईम असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.  रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोट भरतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. या व्हिटामीन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात असते

सफरचंद

सफरचंद खाण्याचा सल्ला अनेकजण देतात. कारण फळांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात यातील पेक्टिनमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते यात हेल्दी एंटी ऑक्सिडेंट्ससु्द्धा असतात.

खरबूज

वजन कमी करण्यासाठी तुम्ही खरबूजाचा आहारात समावेश करू शकता हे एक हायड्रेटींग फळ आहे. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. याशिवाय तरबूजातील एंटी ऑक्सिडे्स त्वचेसाठी उत्तम ठरता. रोज खाल्ल्यास पोट कमी होण्यास मदत होते.

पिअर

पिअर हे फळ पचण्यासाठी  चांगलं आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही पिअरचे सेवन करू शकता. या फळात भरपूर फायबर्स असतात. जे खाल्ल्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि ओव्हर इटींग टाळता येतं.

केळी

केळी खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. पण केळी योग्य प्रमाणात  खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज सकाळी एक केळी  खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखं वाटते. केळ्यात पोटॅशियम, नॅच्युरल शुगर आणि कार्बोहायड्रेटस असतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. 

Web Title: The 5 Best Fruits For Weight Loss : Best fruits for weight loss u can eat this fruits everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.